मनोहर पर्रीकर एम्समध्ये दाखल, वैद्यकीय तपासण्या सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 13:15 IST2019-02-04T13:08:07+5:302019-02-04T13:15:53+5:30

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. एम्समध्ये पर्रीकर यांच्या विविध वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. पर्रीकरांच्या आरोग्याची आताची स्थिती पूर्वीच्या तुलनेत योग्य आहे की नाही?, याचा अंदाज घेऊनच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

Goa chief minister Manohar Parrikar admitted in AIIMS | मनोहर पर्रीकर एम्समध्ये दाखल, वैद्यकीय तपासण्या सुरू

मनोहर पर्रीकर एम्समध्ये दाखल, वैद्यकीय तपासण्या सुरू

ठळक मुद्देमनोहर पर्रीकरांवर एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार वैद्यकीय तपासण्यानंतर पर्रीकरांना डिस्चार्ज मिळणार असल्याची सूत्रांची माहिती

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. एम्समध्ये पर्रीकर यांच्या विविध वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. पर्रीकरांच्या आरोग्याची आताची स्थिती पूर्वीच्या तुलनेत योग्य आहे की नाही?, याचा अंदाज घेऊनच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पर्रीकर आहार म्हणून द्रव पदार्थच घेत आहेत. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या ते थकले आहेत. जास्त वेळे ते चालू शकत नाहीत. व्हील चेअरचा त्यांना आधार घ्यावा लागतो. पर्रीकरांच्या नाकात असलेली ट्युब काढता येईल का? याचाही अंदाज डॉक्टर घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

(पर्रीकरांनी सन्मानाने खुर्ची सोडावी, स्थिती पाहवत नाही - काँग्रेस)

गेल्या गुरुवारी गोवा विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशन संपल्यानंतर वैद्यकीय तपासण्या करण्यासाठी पर्रीकर नवी दिल्लीकडे रवाना झाले. यापूर्वी 14 ऑक्टोबर 2018 रोजी पर्रीकर यांना एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आता अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधीनंतर ते पुन्हा एम्समध्ये दाखल झालेत.  यानंतर ते आपल्या निवासस्थानीच वैद्यकीय उपचार घेत होते. काडिओलॉजिस्ट डॉ. कोलवाळकर आणि अन्य डॉक्टरांच्या निगरानीदेखत त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. यापूर्वी पर्रीकरांना दोनदा तेथेच केमोथेरपीही देण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली. पर्रीकरांना स्वादुपिंडाचा कॅन्सर झाल्याचे गेल्या वर्षी निदान झाले.  

(गोव्याचे विधानसभा अधिवेशन, अर्थसंकल्प केवळ ‘उपचार?’)

दरम्यान, पर्रीकरांचे सहकारी आणि ज्येष्ठ भाजपा आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनाही कॅन्सर झाला आहे.  ते पणजीतील एका हॉस्पिटलमध्ये घेत असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. 

Web Title: Goa chief minister Manohar Parrikar admitted in AIIMS