गोवा : निवृत्त आयपीएस विमल गुप्ताविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 12:32 IST2018-01-18T12:29:31+5:302018-01-18T12:32:17+5:30

 माजी पोलीस महासंचालक सुनिल गर्ग यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्याच्या न्यायालयाच्या आदेशानंतर लाचखोरीचे आरोप असलेले आणखी एक पोलीस अधिकारी माजी उप-महानिरीक्षक विमल गुप्ता यांच्याविरुद्ध भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

Goa: Case filed against retired IPS Vimal Gupta | गोवा : निवृत्त आयपीएस विमल गुप्ताविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा

गोवा : निवृत्त आयपीएस विमल गुप्ताविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा

पणजी - माजी पोलीस महासंचालक सुनिल गर्ग यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्याच्या न्यायालयाच्या आदेशानंतर लाचखोरीचे आरोप असलेले आणखी एक पोलीस अधिकारी माजी उप-महानिरीक्षक विमल गुप्ता यांच्याविरुद्ध भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

आयपीएस अधिकाऱ्यांच्या मनमानीला वेसण घालणारे निर्णय गोव्यात होत असन गर्ग यांच्या पाठोपाठ गुप्ताही आता अडचणीत आले आहेत. गर्ग यांच्याविरुद्ध अद्याप गुन्हा नोंदविण्यात आला नाही परंतु गुप्ता यांच्या विरुद्ध लाचखोरी प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खात्यांतर्गत चौकशीतून बचावण्यासाठी त्याने एक महिला उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल यांच्या कडे लाच मागितल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. या प्रकरणात गुप्ता यांच्या बरोबरच उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल तसेच उपनिरीक्षकाच्या पतीवरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एखाद्या आयपीएस अधिकाऱ्यावर लाचखोरी प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची गोव्यात ही पहिलीच घटना आहे. 

Web Title: Goa: Case filed against retired IPS Vimal Gupta