Goa: माशे- दापट येथे बस-कारचा अपघात, कारचालकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 12:25 IST2024-04-08T12:23:34+5:302024-04-08T12:25:45+5:30

Goa News: माशे-दापट येथे सोमवारी सकाळी झालेल्या कार व कदंब बसच्या समोरासमोर झालेल्या भिषण धडकेत कारचालक जागीच ठार झाला. राजेश वेर्णेकर (५२) असे त्याचे नाव आहे. या अपघातात अन्य पाचजण जखमी झाले. कारमधील कुटूंब कारवार येथून गोव्यात देवदर्शनाला येत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Goa: Bus-car accident at Mashe- Dapat, driver killed on the spot | Goa: माशे- दापट येथे बस-कारचा अपघात, कारचालकाचा जागीच मृत्यू

Goa: माशे- दापट येथे बस-कारचा अपघात, कारचालकाचा जागीच मृत्यू

काणकोण - माशे-दापट येथे सोमवारी सकाळी झालेल्या कार व कदंब बसच्या समोरासमोर झालेल्या भिषण धडकेत कारचालक जागीच ठार झाला. राजेश वेर्णेकर (५२) असे त्याचे नाव आहे. या अपघातात अन्य पाचजण जखमी झाले. कारमधील कुटूंब कारवार येथून गोव्यात देवदर्शनाला येत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार माशे-दापट येथे हा अपघात झाला. कदंबची इलेक्ट्रिक बस आणि कारची समोरासमोर धडक झाली. कारमध्ये सहाजण होते. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.  चालक राजेश याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच जखमींना काणकोणच्या सामाजिक इस्पितळात प्राथमिक उपचार करून मडगावच्या जिल्हा इस्पितळात पाठवून देण्यात आले आहे. मूळ गदग (कर्नाटक) येथील वेर्णेकर कुटूंबीय कारवार येथे राहतात. ते देवदर्शनासाठी गोव्यात येत होते असे सांगण्यात आले. याप्रकरणी काणकोण पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: Goa: Bus-car accident at Mashe- Dapat, driver killed on the spot