दामू नाईकांनी घेतली अमित शाह यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2025 09:27 IST2025-02-14T09:26:45+5:302025-02-14T09:27:14+5:30
पक्ष बांधणीसाठीही शाह यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

दामू नाईकांनी घेतली अमित शाह यांची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. शाह यांनी दामूंकडून गोव्यातील राजकीय स्थितीविषयी जाणून घेतले. दामू यांनी त्यांना राज्यात भाजपने सव्वा चार लाख सदस्य बनवल्याची माहिती दिली.
या भेटीनंतर प्रसार माध्यमांना माहिती देताना दामू म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी 'विकसित भारत' साठी दिलेले योगदान कार्यकर्त्यांना स्फूर्ती देणारे आहे. शहा यांचे अमूल्य मार्गदर्शन येणाऱ्या काळात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यास मदत करील. दामू म्हणाले की, 'पक्ष बांधणीसाठीही शाह यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.'