शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

पर्यटकांनी पाठ फिरवल्याने गोव्याचे किनारे सुने सुने!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 03:55 IST

देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन पेटल्याच्या पार्श्वभूमीवर काही राष्ट्रांनी

किशोर कुबल 

पणजी : मावळत्या वर्षाला निरोप, नवीन वर्षाचे स्वागत आणि नाताळासाठी दरवर्षी पर्यटकांनी ‘हाउसफुल्ल’ होणारा गोवा यंदा मात्र सुना-सुना आहे. पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरविलेली आहे. म्हादई नदीच्या पाण्यासाठी पर्यावरण संघटना आणि राजकीय पक्षांनीही आंदोलन पुकारत पर्यटकांनी गोव्यात येऊ नये, असा इशाराही दिला आहे. यंदा देशी-परदेशी पाहुण्यांची संख्या आधीच घटलेली आहे. त्यामुळे व्यावसायिक चांगलेच धास्तावलेले आहेत.

देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन पेटल्याच्या पार्श्वभूमीवर काही राष्ट्रांनी नागरिकांना भारतात न जाण्याचे आवाहन केले आहे. याचाही परिणाम झाला असावा, असे जाणकारांना वाटते. गोव्यात दरवर्षी साधारण ८0 लाख देशी आणि ६ ते ७ लाख परदेशी पर्यटक येतात. यंदा हा आकडा निम्म्यावर येईल. गोव्याला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांमध्ये ब्रिटिश पाहुण्यांचा दुसरा क्रमांक लागतो. सर्वाधिक पर्यटक रशियातून येत असतात. थॉमस कूक कंपनी आठवड्याला सात चार्टर विमानांमधून कमीत कमी २१00 ब्रिटिश पर्यटक गोव्यात आणत असे. परंतु या खेपेला ही संख्या कमालीची घटली आहे.पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक नृत्य महोत्सव (इडीएम) भरवले आहेत. वागातोर येथे सनबर्न क्लासिकचा इडीएम २७ ते २९ रोजी आहे. यंदा पर्यटकांच्या संख्येवर परिणाम झाला असेल तर तो जागतिक मंदीचा परिणाम असावा.- बाबू आजगावकर, पर्यटनमंत्री, गोवासध्या विमान भाडे महागले आहे. टुरिस्ट टॅक्सीवाले नाताळ-नववर्षात भाडे वाढवतात. गोव्याच्या तुलनेत विदेशात पर्यटन स्वस्त झाले आहे, त्यामुळे पर्यटक तिकडे वळत असावेत.- सावियो मेशियस, अध्यक्ष, टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन आॅफ गोवा 

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन