शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पैशांसाठी केलेले मित्राचेच अपहरण आणि खून

By admin | Updated: June 23, 2014 01:37 IST

आठ वर्षांनंतर मंदार सुर्लकर प्रकरण निवाड्याकडे : आज निकाल शक्य

सुशांत कुंकळयेकर - मडगाव - आठ वर्षांपूर्वी संपूर्ण गोव्याला हादरवून सोडणाऱ्या मंदार सुर्लकर खून प्रकरणाचा निवाडा सोमवार दि. २३ रोजी बाल न्यायालयाचे न्यायाधीश बी. पी. देशपांडे देण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा निवाडा काय होईल याची उत्सुकता आहे. दुर्दैवी सुर्लकर कुटुंबाला न्याय मिळेल का, हेही आजच्या निवाड्याने स्पष्ट होणार आहे. १४ आॅगस्ट २00६ रोजी मंदारचे त्याच्याच मित्राने अपहरण केले होते. ५0 लाखांच्या खंडणीसाठी हे अपहरण केल्याचा पोलिसांचा दावा आहे. दुसऱ्या दिवशी केरी-फोंडा येथे मंदारचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणात मंदारचे मित्र असलेले रोहन धुंगट, रायन पिंटो, नफियाज शेख, शंकर तिवारी तसेच अल सलेहा बेग यांना अटक केली होती. यापैकी बेगला नंतर माफीचा साक्षीदार म्हणून घोषित केले होते तर इतर सर्व संशयित मागची आठ वर्षे तुरुंगात स्थानबध्द आहेत. या प्रकरणात माफीचा साक्षीदार ही सवलत मिळालेला बेग याने दिलेली साक्ष शहारे आणणारी होती. मंदार सुर्लकर हा एक व्यावसायिक डीजे होता. मंदारचे वडील वास्कोतील बिल्डर होते. ज्यांनी मंदारचा खून केला, त्यांना पैशांची निकड होती. त्यामुळे मंदारच्या वडिलांकडून मोठे घबाड मिळेल यासाठीच हा प्लॅन रचला होता. हा प्लॅन पूर्णत्वास आल्यास प्रत्येक संशयिताला प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचा वायदा झाला होता. माफीचा साक्षीदार बनलेल्या बेगच्या साक्षीप्रमाणे हा अपहरणाचा प्लॅन रोहनने रचला होता व त्यासाठी त्याने रायनची मदत घेतली होती. व्यवसायाने डीजे असलेल्या मंदारला त्याच्या मित्रांनी पणजीत एक मोठा कार्यक्रम करायचा आहे, यासाठी चर्चेसाठी बोलावले होते. रोहनने रचलेल्या कटाप्रमाणे रायन मोटार गाडी घेऊन १४ आॅगस्ट २00६ रोजी वास्कोला निघाला होता. त्याच्याबरोबर बेगही होता. वास्कोहून मंदारचे अपहरण करून त्याला पणजीला आणायचे, नंतर त्याला रायनच्या उसकई येथील घरी न्यायचे, असा प्लॅन शिजला होता. आपले ईप्सित साध्य झाल्यावर मंदारचा कायमचा काटा काढण्याची तयारी त्यांनी ठेवली होती. मंदारला बांधून ठेवण्यासाठी दोरी, तोंड बंद करण्यासाठी टेप, त्याला बेशुध्द करण्यासाठी दारूने भरलेली सिरिंज तसेच ठार करण्यासाठी बेसबॉलची बॅट अशी तयारी ठेवली होती. बेग याच्या साक्षीप्रमाणे त्या दिवशी मंदारला वास्कोहून मिरामारला आणले. त्याला गाडीतच जखडले. त्याने आवाज करू नये यासाठी त्याचे तोंड टेपने बंद केले होते. त्याच्या हालचाली मंदाव्यात यासाठी आरोपींनी बरोबर आणलेल्या सिरिंजमधून त्याला व्होडकाचा डोसही पाजला होता. मंदारच्याच मोबाईलवरून आरोपींनी त्याच्या वडिलांना फोन करून ५0 लाखांची खंडणी मागितली होती. त्यांनी त्यांना घाबरलेल्या मंदारचा आवाजही ऐकविला होता आणि पोलिसांकडे न जाण्याची ताकीदही दिली होती. बेग याच्या साक्षीप्रमाणे मंदारचे अपहरण केल्यानंतर त्याला कसे बांधून ठेवावे यासाठी संशयितांनी रंगीत तालीमही केली होती. यासाठी रायनने स्वत: आपल्याला सोफ्याला बांधून घेतले होते. मंदारच्या वडिलांकडून खंडणी मिळणार नाही याची खात्री झाल्यावर तसेच मंदारकडून नावे सांगितली जाणार या भीतीने रायननेच बेसबॉलच्या बॅटने मंदारच्या डोक्यावर वार केला, असे बेगने साक्षीत सांगितले होते. अपहरण झाल्यानंतर वास्कोचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व सध्याचे पोलीस उपअधीक्षक महेश गावकर यांनी रोहनला ताब्यात घेतल्यावर प्रारंभी पोलिसांची दिशाभूल केली. नंतर या अपहरणाची कबुली दिली; मात्र तोपर्यंत त्याच्या मित्रांनी मंदारचा काटा काढला होता. त्यामुळे जिवंत मंदारच्या ऐवजी त्याच्या कुटुंबीयांना मंदारचा मृतदेहच हाती लागला.