शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी चार नगरसेवकांचे अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 9:39 PM

मुरगाव नगरपालिकेचा ५० वा नगराध्यक्ष निवडण्यासाठी बुधवारी (दि.१७) सकाळी पालिका सभागृहात बैठक बोलवण्यात आली असून, ह्या पदासाठी मंगळवारी (दि.१५) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चार नगरसेवकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

 वास्को - मुरगाव नगरपालिकेचा ५० वा नगराध्यक्ष निवडण्यासाठी बुधवारी (दि.१७) सकाळी पालिका सभागृहात बैठक बोलवण्यात आली असून, ह्या पदासाठी मंगळवारी (दि.१५) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चार नगरसेवकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. पालिकेच्या सध्याच्या सत्ताधारी गटातील नगरसेवक क्रितेश गावकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला अर्ज दाखल केलेला असून विरोध गटातील नगरसेवक फ्रेड्रीक्स हॅन्रीक, नंदादीप राऊत व निलेश नावेलकर यांनी नगराध्यक्षासाठी अर्ज दाखल केले आहेत. सध्याचे चित्र पाहता क्रितेश यांच्या गळ््यात नगराध्यक्ष पदाची माळ पडणार असल्याचे दिसून येत असले तरी ह्या निवडणूकीपूर्वी सध्या चालू असलेल्या राजकीय हालचाली पाहता मुरगावचा पुढचा नगराध्यक्ष कोण हे निवडणूकीनंतरच स्पष्ट होणार आहे.भावना नानोस्कर यांच्यावर अविश्वास ठराम संमत करून त्यांना ह्या खुर्चीवरून हटविल्यानंतर मुरगाव पालिकेचा नवीन नगराध्यक्ष निवडण्यासाठी बुधवारी सकाळी ११.३० वाजता बैठक बोलवली आली आहे. पालिका सभागृहात सदर बैठक घेण्यात येणार असून मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धीविनायक नाईक सदर निवडणूक बैठकीला निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत. बुधवारी निवडून येणार असलेला नगराध्यक्ष मुरगाव नगरपालिकेचा ५० वा नगराध्यक्ष बनणार असून ही माळ कोणाच्या गळ्यात हे बुधवारी दुपारीच स्पष्ट होणार आहे.नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी भरण्यासाठी मंगळवार पर्यंत वेळ देण्यात आला असून ह्या शेवटच्या दिवशी चार नगरसेवकांचे अर्ज आलेले असल्याची माहीती मुरगावचे मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडीस यांनी दिली. यात नगरसेवक क्रितेश गावकर, फ्रेड्रीक्स हॅन्रीक, नंदादीप राऊत व निलेश नावेलकर यांचा समावेश असल्याची माहीती त्यांनी पुढे दिली. क्रितेश गावकर यांनी ६ अर्ज भरलेले असल्याची माहीती आग्नेलो यांनी देऊन इतर तीन नगरसेवकांनी प्रत्येकी एक अर्ज सादर केले असल्याचे सांगितले. मुरगाव पालिकेतील नगराध्यक्ष पदाबाबतचे सध्याचे राजकीय चित्र पाहता क्रितेश यांच्याच गळ््यात नगराध्यक्षाची माळ पडणार असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी गटात १३ तर विरोधी गटात १२ नगरसेवक असून १ मताने सत्ताधारीची बाजू बळकट असल्याने क्रितेश यांचा विजय होण्याची शक्यता जास्त वाढलेली आहे. तसेच क्रितेश नगरविकासमंत्री मिलींद नाईक यांच्या जवळीक असून त्यांचा पाठींबाही सत्ताधारी गटाला असल्याने सदर बाजू जास्त बळकट असल्याचे दिसून येत आहे.

विरोधी गटात १२ नगरसेवक असून ह्या गटाला आमदार कार्लुस आल्मेदा यांचा पाठींबा असून त्यांच्या गटातील नगरसेवकाला नगराध्यक्ष बनवण्यासाठी मंगळवारी रात्री पर्यंत विविध प्रकारच्या राजकीय हालचाली चालू असल्याची माहीती सूत्रांनी दिली. ह्या गटातून तीन नगरसेवकांनी नगराध्यक्ष पदासाठी आपले अर्ज भरलेले असून बुधवारी सकाळी बैठक सुरू झाल्यानंतर यापैंकी दोन नगरसेवक अर्ज मागे घेणार असल्याचे समजते. सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवक यांच्या फक्त एक मताचा फरक असून सध्या चाललेल्या विविध हालचालीतून ह्या क्रमांक संख्येत बदल सुद्धा होऊ शकतो अशी चर्चा असल्याने बुधवारी निवडणूक बैठक झाल्यानंतरच नगराध्यक्षाबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण