'फॉर्मुला ४' रेस होणारच; कामाला प्रत्यक्ष सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 10:41 IST2025-10-07T10:38:27+5:302025-10-07T10:41:43+5:30
आढाव्यानंतर दिगंबर कामत यांनी दिली माहिती

'फॉर्मुला ४' रेस होणारच; कामाला प्रत्यक्ष सुरूवात
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : गोव्याला पहिल्यांदाच 'गोवा स्ट्रीट रेस २०२५' (फॉर्मुला ४) आयोजित करण्याची संधी मिळाली असून राज्य सरकारने त्याचे आयोजन करण्याचे निश्चित केले आहे. 'फॉर्मुला ४' रेस प्रतिष्ठीत 'इव्हेंण्ट' असून त्याच्या आयोजनासाठी विविध कामांना सुरवात झाली आहे. 'फॉर्मुला ४' संदर्भात कोणालाही कुठल्याही प्रकारची समस्या असल्यास ती दूर करून रेसचे आयोजन केले जाणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी दिले.
बोगदा परिसरात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात (१ आणि २ नोव्हेंबर) 'फॉर्मुला ४' रेसचे आयोजन होईल. त्याबाबतच्या तयारीसंदर्भात आढावा घेण्यासाठी मंत्री कामत यांनी काल सोमवारी संध्याकाळी बायणा येथे येऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तयारीबाबत आढावा घेतल्यानंतर मंत्री कामत यांनी रेसच्या आयोजनाच्या कामाची सुरवात झाल्याची माहिती दिली.
पुढील आठवड्यात रस्त्यांचे डांबरीकरण
दाबोळी 'वालिस जंक्शन' जवळील दुर्दक्षा झालेल्या 'सव्हींस रोड' रस्त्याचे ३० सप्टेंबरपर्यंत डांबरीकरण (होट मिक्सींग) केले जाणार असल्याचे आश्वासन काही दिवसांपूर्वी मंत्री कामत यांनी दिले होते. ते काम झाले नसल्याने त्यांना पत्रकारांनी विचारले असता पावस पडत असल्याने हॉटमिक्सींग प्लांट सुरू झालेला नाही.
तो सुरू झाल्यानंतर चार दिवसानंतर दाबोळी येथे उड्डाणपूल बांधण्यात येत असलेल्या खालच्या परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार असल्याचे सांगितले. १० ते ११ ऑक्टोंबरपर्यंत दाबोळी येथील सव्हींस रोडचे डांबरीकरण होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
'फॉर्मुला ४' प्रतिष्ठीत 'इव्हेंट' असून त्याच्या आयोजनाची संधी पहिल्यांदाच गोव्याला मिळाल्याने त्याचे आयोजन करण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे, असे त्यांनी सांगितले. 'फॉर्मुला ४' आयोजनावेळी कुठल्याच प्रकारची समस्या निर्माण होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल. 'फॉर्मुला ४' च्या आयोजनाच्या विषयात कोणालाही कुठल्याही प्रकारची समस्या असल्यास ती दूर करण्यात यावी, असे मी मुख्याधिकाऱ्यांना कळविले आहे. समस्या असल्यास त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना अथवा संबंधितांना संपर्क करावा, त्यांच्या समस्या दूर केल्या जाईल, असे कामत यांनी सांगितले. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांना संपर्क करावा, ते नक्कीच त्यांची समस्या दूर करतील, असे कामत यांनी सांगितले.