परकीय भाषा प्रशिक्षण सुरू करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 14:18 IST2026-03-26T14:17:44+5:302026-03-26T14:18:27+5:30

पद्मिनी संस्थेचा स्थापना दिवस उत्साहात

foreign language training to be started said cm pramod sawant | परकीय भाषा प्रशिक्षण सुरू करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

परकीय भाषा प्रशिक्षण सुरू करणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: विद्यार्थी कोणत्याही उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी राज्य सरकार आणि मातोश्री पद्मिनी शैक्षणिक संस्था एकत्रितपणे प्रयत्नशील आहेत. विविध कौशल्य शिक्षणाची संधी देऊन विद्यार्थ्यांना राज्याबाहेर आणि जागतिक पातळीवर जाण्याची तयारी करण्याचा मनोदय संस्थेचा आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात संधी उपलब्ध असल्यामुळे लवकरच परकीय भाषा शिकण्यासाठी 'फॉरेन लँगव्हेज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट' सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत काल बुधवारी दिली.

मातोश्री पद्मिनी शैक्षणिक संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त साखळी रवींद्र भवनात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत बोलत होते. व्यासपीठावर गोमेकॉचे वैद्यकीय खातेप्रमुख जगदीश काकोडकर, राज्य उच्च शिक्षण, सरकारी प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी महादेव गावस, संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग कुट्टीकर, व्यवस्थापक संतोष मळीक, सीईओ स्नेहा भागवत आणि इतर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, की साई लाईफ केअर या नावाने सुरू झालेल्या कामाने आज व्यवसायिक महाविद्यालय सुरू करण्यापर्यंत प्रगती केली आहे. या संस्थेने २००० साली अंगणवाडी सुरू केली आणि २०१४ साली साई नर्सिंग इन्स्टिट्यूट स्थापन करून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या.

या संस्थेच्या माध्यमातून उत्तीर्ण होणाऱ्या २० टक्के विद्यार्थ्यांना रोजगार मिळालेला आहे, आणि ते मोठ्या अभिमानाने 'आम्ही या संस्थेचे विद्यार्थी आहोत' असे सांगतात. हीच संस्थेची खरी कमाई असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कार्यक्रमात जगदीश काकोडकर आणि महादेव गावस यांनी विद्यार्थी आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्वागत करताना व्यवस्थापक संतोष मळीक उपस्थित होते.

'मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजनेतून शुल्क भरण्याची सोय'

राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण सुविधा अपुरी असल्यामुळे विद्यार्थ्यांना या शिक्षणासाठी राज्याबाहेर जावे लागते. त्यामुळे त्यांना आपले राज्य आणि कुटुंबापासून दूर राहावे लागते. ही समस्या लक्षात घेऊन साई नर्सिंग इन्स्टिट्यूटने प्रथम नर्सिंग कोर्स आणि आज फिजिओथेरपी, नेचरोपेथी, योगिक सायन्स, फार्मसी महाविद्यालय अशा कोर्सेस उपलब्ध करून दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजनेतून शुल्क भरण्याची सोय असल्यामुळे कोणीही गरजू विद्यार्थी वंचित राहणार नाही. संस्थेकडूनही शिष्यवृत्ती देऊन गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

'एकाच पदवी शिक्षणावर अवलंबून राहू नका'

विद्यार्थ्यांनी फक्त एका शाखेतील पदवी शिक्षणावर अवलंबून न राहता उपलब्ध शैक्षणिक संधींचा लाभ घेतले पाहिजे. संस्थेत शिक्षण घेणाऱ्यांना १०० टक्के रोजगार मिळेल, यासाठी व्यवस्थापन सतत प्रयत्नशील आहे. या दृष्टीने संस्था सरकारमार्फत विविध संसाधने निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 

Web Title : विदेशी भाषा प्रशिक्षण संस्थान शुरू होगा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Web Summary : गोवा में जल्द ही विदेशी भाषा प्रशिक्षण संस्थान खुलेगा। मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने छात्रों को, विशेषकर चिकित्सा में, वैश्विक अवसर प्राप्त करने में मदद करने के लिए इस पहल की घोषणा की। मातृश्री पद्मिनी शैक्षणिक संस्थान भी कौशल-आधारित शिक्षा और छात्रवृत्ति प्रदान करेगा।

Web Title : Foreign Language Training Institute to Start: Chief Minister Pramod Sawant

Web Summary : Goa to get a Foreign Language Training Institute soon. Chief Minister Pramod Sawant announced this initiative to help students pursue global opportunities, especially in medicine. The Matoshree Padmini Educational Institute will partner in this endeavor, also offering skill-based education and scholarships.