शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूक धोरण ठीक; पण कार्र्यवाहीचे काय?

By admin | Updated: June 20, 2014 02:43 IST

पणजी : सरकारने मोठा गाजावाजा करत राज्यासाठी लांबलचक गुंतवणूक धोरण आणलेले असले तरी, या धोरणाची अंमलबजावणी नेमकी कशी होईल याबाबत

पणजी : सरकारने मोठा गाजावाजा करत राज्यासाठी लांबलचक गुंतवणूक धोरण आणलेले असले तरी, या धोरणाची अंमलबजावणी नेमकी कशी होईल याबाबत धोरणाचे समर्र्थक आणि विरोधक असे दोन्ही घटक साशंक आहेत. गोव्यात आताच विजेचा पुरवठा यथोचित होत नसल्याने उद्योग हैराण आहेत. केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर गुंतवणूक धोरण जाहीर करणारे गोवा देशातील पहिले राज्य आहे. केंद्रात व गोव्यात एकाच पक्षाचे सरकार अधिकारावर असल्याने राजकीयदृष्ट्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर मजबूत स्थितीत असल्याने गुंतवणूक धोरण मार्गी लावण्यास अनुकूल स्थिती आहे, असे चेंबर आॅफ कॉमर्र्सचे माजी अध्यक्ष नितीन कुंकळ््येकर यांना वाटते. मात्र, गुंतवणूक धोरणात पर्यटन, आयटी, आरोग्य असे अनेक विषय असल्याने या प्रत्येक विषयासाठी उपधोरण तयार करावे लागेल, असे कुंकळ््येकर यांचे म्हणणे आहे. मणिपाल इस्पितळाच्या क्लिनिकल विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी मात्र प्रकल्पांसाठी गोव्यात अगोदर चोवीस तास वीज व पाण्याचा पुरवठा व्हावा, असे मत मांडले. कोणती जमीन पर्यावरण रक्षणासाठी ठेवावी, कोणती बांधकामांपासून मुक्त ठेवावी, अशा बाबी सरकारने निश्चित करून अगोदर प्रादेशिक आराखडा फ्रिज करावा, असे कॅन्सरतज्ज्ञ असलेले साळकर म्हणाले. गोव्याला मलेरिया व डेंग्यूमुक्त व कचरामुक्त करून मग वैद्यकीय पर्यटनाच्या गोष्टी बोलता येतील, असे साळकर म्हणाले. गोव्यात यापूर्वी मांद्रे येथे आयटी सिटी व दोनापावल येथे आयटी हॅबिटेटसारखे उद्योग आणण्याच्या योजना गलिच्छ राजकारणाच्या बळी ठरल्या. त्यामुळे आता पन्नास हजार नोकऱ्यांच्या निर्मितीची भाषा ऐकणे कठीण जाते, असे गोव्याचे पहिले माजी आयटी मंत्री रमाकांत खलप म्हणाले. कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी सरकारने कामगारवर्र्गाला न विचारता किंवा किंचितही विश्वासात न घेता गुंतवणूक धोरण तयार केल्याची टीका केली. (खास प्रतिनिधी)