शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

गोव्यात कृषी पर्यटनासाठी प्रथमच अर्थसंकल्पात तरतूद, एक कोटींचा निधी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 16:57 IST

गोव्याच्या आत्तापर्यंतच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी कोट्यवधींची तरतूद होत होती, पण कृषी पर्यटनाकडे कधीच गांभीर्याने पाहिले गेले नव्हते. मात्र, आता राज्य सरकारने काळाची गरज ओळखत कृषी पर्यटनासाठी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात एक कोटींची तरतूद केली आहे.

- विलास ओहाळपणजी : गोव्याच्या आत्तापर्यंतच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी कोट्यवधींची तरतूद होत होती, पण कृषी पर्यटनाकडे कधीच गांभीर्याने पाहिले गेले नव्हते. मात्र, आता राज्य सरकारने काळाची गरज ओळखत कृषी पर्यटनासाठी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात एक कोटींची तरतूद केली आहे.राज्यात खाण व्यवसाय हा मुख्य व्यवसाय मानला जातो. मात्र, हा व्यवसाय दीर्घकाळ चालणारी बाब नसल्याने राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अर्थसंकल्पात कृषी खात्यासाठी थोडासा हात ढिला केला आहे. कृषी क्षेत्रासाठी २०१८-१९ या वर्षाकरिता एकूण १८२ कोटींची तरतूद केली आहे. पर्यटन हा राज्यातील खाणीनंतर दुसºया क्रमांचा व्यवसाय मानला जातो. त्यामुळेच राज्याच्या पूर्वेकडील सह्याद्रीची पर्वतरांग आणि त्यातील वाड्यावस्त्यांवर फुलणारी शेती ही विविध हंगामात आकर्षण ठरते. राज्याने बाराही महिने पर्यटन हंगाम म्हणून यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यात रिव्हर टुरिझमची मध्यंतरी भर पडली. त्यात पूर्वेकडील तालुक्यांतील नद्यांमध्ये बोटिंग करण्याबरोबर नद्यांमध्ये राफ्टिंग करण्यासाठी पावसाळ््यात पर्यटकांच्या सहली आयोजिल्या जातात. त्यात आता अ‍ॅग्रो टुरिझम तथा कृषी पर्यटनाची भर पडली आहे.

युवकांनी योजनेचा फायदा घ्यावा!कृषी पर्यटनासाठी सरकारने केलेली एक कोटीची तरतूद ही चांगली बाब आहे. सरकार तरतूद करते पण त्या-त्या खात्याने त्या निधीच्या उपयोगासाठी योजना तयार करणे आणि त्या राबविणे आवश्यक आहे. कारण अनेकवेळा आर्थिक वर्षाअखेरीस अमुक खात्याचा एवढा निधी पडून राहतो. त्यामुळे सरकारने या योजनेसाठी तरतूद केली असेल, तर लवकरात लवकर त्या अनुषंगाने कृषी खात्याने योजना तयार करावी. युवा वर्ग हळूहळू शेतीकडे वळत असून, त्यांना त्याचा निश्चित फायदा होईल, असे मत धारबांदोडा तालुक्यातील दाभाळ गावचे प्रगतीशील शेतकरी डॉ. सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केले. 

 

 

टॅग्स :goaगोवा