गणेशपुरीला जाणाऱ्या रस्त्यावरील दोन दुकानांना आग, ५० लाखांचे नुकसान 

By काशिराम म्हांबरे | Updated: October 22, 2023 11:47 IST2023-10-22T11:46:21+5:302023-10-22T11:47:16+5:30

घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती अग्नी शमन दलाकडून देण्यात आली.

Fire to two shops on the road leading to Ganeshpuri, loss of 50 lakhs | गणेशपुरीला जाणाऱ्या रस्त्यावरील दोन दुकानांना आग, ५० लाखांचे नुकसान 

गणेशपुरीला जाणाऱ्या रस्त्यावरील दोन दुकानांना आग, ५० लाखांचे नुकसान 

म्हापसा : हाऊसिंग बोर्ड म्हापसा येथील सेंट झेवियर कॉलेज समोरील गणेशपुरीला जाणाऱ्या रस्त्यावरील दोन दुकानांना आग लागून सुमारे ५० लाख रुपयांची नुकसानी झाली आहे.

घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती अग्नी शमन दलाकडून देण्यात आली. आगीत एका स्टेशनरी दुकानाला तसेच लॉड्रीला आग लागून त्यातील सर्व सामान जळून खाक झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे दलाकडून सांगण्यात आले. आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाली असली तरी शेजारील दुकाने आगीच्या भडक्यापासून वाचवण्यात मात्र दलाच्या जवानांना यश प्राप्त झाले.

घटनेची माहिती उपलब्ध होतात दलाचे जवान घटना स्थळी दाखल होऊन सुमारे दोन तासाच्या मेहनतीनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आगीवर नियंत्रणासाठी दोन बंबांचा वापर करण्यात आलेला. तसेच परिसरातील लोकांनीही दलाच्या जवानांना सहकार्यकेले.आग विजवण्यापूर्वी भागातील वीज पुरवठा खंडीत करावा लागला.
 

Web Title: Fire to two shops on the road leading to Ganeshpuri, loss of 50 lakhs