गोव्यात पर्यटन हंगामात ‘बड्या’ विवाह समारंभासाठीचे शुल्क ६ हजार रुपयांवरून ५० हजार रुपये

By किशोर कुबल | Published: June 16, 2023 02:33 PM2023-06-16T14:33:58+5:302023-06-16T14:34:18+5:30

अधिसूचना जारी : पर्यटन सेवांसाठीच्या शुल्कात वाढ

Fees for big wedding ceremonies in Goa during tourist season from Rs 6 thousand to Rs 50 thousand | गोव्यात पर्यटन हंगामात ‘बड्या’ विवाह समारंभासाठीचे शुल्क ६ हजार रुपयांवरून ५० हजार रुपये

गोव्यात पर्यटन हंगामात ‘बड्या’ विवाह समारंभासाठीचे शुल्क ६ हजार रुपयांवरून ५० हजार रुपये

googlenewsNext

पणजी : सरकारने अधिसूचना काढून पर्यटन सेवांसाठीच्या शुल्कात वाढ केली आहे. समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही शुल्कवाढ करण्यात आली आहे.

गोवा हे ‘वेडिंग डेस्टिनेशन’ बनले असून बडे राजकारणी, उद्योगपती आपल्या मुला मुलींचे विवाह गोव्यात आयोजित करीत असतात. पर्यटन हंगामात रिसॉर्ट किंवा बड्या हॉटेलांमध्ये विवाह समारंभ आयोजित केल्यास शुल्क ६ हजार रुपये होते ते वाढवून आता ५० हजार रुपये करण्यात आले आहे. तसेच  संगीत महोत्सवाचे शुल्क ५ हजार क्षमतेपर्यंत  १८ लाख रुपये, ५ हजार ते १० हजार उपस्थितीच्या क्षमतेपर्यंत ३० लाख रुपये व १० हजारांपेक्षा जास्त उपस्थिती असल्यास ३५ लाख रुपये शुल्क केले आहे.

नाईट बाजार किंवा हस्तकला वस्तूंची विक्री होणार्या बाजारांसाठी ६० हजार रुपये, कार रॅली, दुचाक्यांचा सप्ताा, तिकीटे न आकारता आयोजित केला जाणारा संगीत महोत्सव, प्रदर्शने व पर्यटनाशी निगडीत अन्य आयोजनासाठी ६० हजार रुपये शुल्क आहे. पर्यटन हंगाम नसल्यास शुल्क एक-पंचमांश असेल. हंगामात मात्र ते पाच पटींनी जास्त असेल. दरवर्षी १० टक्के शुल्कवाढ होणार आहे, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

Web Title: Fees for big wedding ceremonies in Goa during tourist season from Rs 6 thousand to Rs 50 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.