नराधम बापाने केला स्वतःच्या मुलीवर बलात्कार; संशयिताला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 15:21 IST2019-12-19T12:51:10+5:302019-12-19T15:21:07+5:30
बापानेच स्वतःच्या मुलीवर बलात्कार करण्याची धक्कादायक व किळसवाणी घटना गोव्यात उघडकीस आली आहे.

नराधम बापाने केला स्वतःच्या मुलीवर बलात्कार; संशयिताला अटक
मडगाव: बापानेच स्वतःच्या मुलीवर बलात्कार करण्याची धक्कादायक व किळसवाणी घटना गोव्यात उघडकीस आली आहे. राज्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील मडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी त्या नराधम बापाला बेडयाही ठोकल्या आहे. संशयिताला अटक केली असून, पुढील तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बायलाचो एकवोट या बिगर सरकारी संस्थेच्या आवदा व्हिएगस या तक्रारदार आहेत.
भारतीय दंड संहितेंच्या ३७६ , गोवा बाल कायदा कलम ८ (२) तसेच बाल संरक्षण कायदा कलम ४ अंतर्गंत पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लॉरीन सिक्वेरा या पुढील तपास करीत आहेत. तक्रारीत नमूद केल्याप्रामणे या महिन्याच्या ६ डिसेंबरपुर्वी ही घटना घडली. संशयिताने आपल्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.