शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

‘गेल’ प्रकल्पाचा फज्जा

By admin | Updated: June 8, 2014 01:23 IST

गॅस अथोरिटी आॅफ इंडियाने (गेल) गोव्यात राबविलेला सुमारे दीडशे कोटी रुपयांचा व ३६ किलोमीटर लांबीचा वायू पुरवठा प्रकल्प पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरला;

गॅस अथोरिटी आॅफ इंडियाने (गेल) गोव्यात राबविलेला सुमारे दीडशे कोटी रुपयांचा व ३६ किलोमीटर लांबीचा वायू पुरवठा प्रकल्प पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरला; पण त्यानंतर या प्रकल्पाचे काम रखडले असून दुसऱ्या टप्प्यात प्रकल्पाचा फज्जा उडल्यासारखी स्थिती आहे. राज्यातील अनेक बडे उद्योग गॅस मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. गॅस अथोरिटी आॅफ इंडियाचे अधिकारी हा प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. डिचोली, फोंडा व मुरगाव तालुक्यात एकूण ३६ किलोमीटर लांबीची गॅस वाहिनी यशस्वीरीत्या टाकण्यात आली. मुरगाव तालुक्यातील झुआरी, रिलायन्स व अन्य एका उद्योगाला गेलकडून वायू पुरविलाही जात आहे. मात्र, डिचोली, फोंडा, वेर्णा, बार्देस आदी ठिकाणच्या उद्योगांना गॅस पुरविण्यासाठी वाहिन्या टाकण्याचे काम अडले आहे. नेस्ले, कोका कोला, बिनानी, बर्गर पेन्ट्स, एचईएल असे अनेक उद्योग आणि गोवा सरकारच्याही यंत्रणा गेलचा वायू स्वीकारण्यास तयार आहेत; पण त्यासाठी गोव्यातील ३६ किलोमीटर लांबीच्या मुख्य वायू वाहिनीला जोडून अन्य ज्या छोट्या वाहिन्या टाकायच्या आहेत, ते काम अडले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने गेलला रस्त्याच्या कडेने वाहिन्या टाकण्यास सांगितले आहे; पण रस्त्याच्या कडेची जागा ही अनेक भागात बांधकाम खात्याची नाहीच, अशी माहिती प्रशासकीय पातळीवरून मिळाली. त्यामुळे गेलचा सुमारे १००-१५० कोटींचा प्रकल्प केवळ ३६ किलोमीटर लांबीची वाहिनी टाकण्यापुरता आणि मुरगावमधील तीन उद्योगांना वायू पुरविण्यापुरताच मर्यादित राहाणार काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. कदंब वाहतूक महामंडळाच्या बसगाड्याही सीएनजीवर चालविण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे.