लईराई मंदिराच्या कुंपणापासून १५० मीटरनंतरच खोदकाम; कंपनीचे हमीपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 11:38 IST2025-04-19T11:38:25+5:302025-04-19T11:38:59+5:30

शिरगाव-मये खाणब्लॉक सुरू होणार

excavation only after 150 meters from the fence of lairai temple company guarantee letter | लईराई मंदिराच्या कुंपणापासून १५० मीटरनंतरच खोदकाम; कंपनीचे हमीपत्र

लईराई मंदिराच्या कुंपणापासून १५० मीटरनंतरच खोदकाम; कंपनीचे हमीपत्र

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : शिरगांव-मयें खाण ब्लॉक -२ येत्या महिन्यात सुरू होणार आहे. साळगांवकर शिपिंग कंपनीकडे गेलेल्या या १७१.२ हेक्टर क्षेत्राच्या खाण ब्लॉकमध्ये शिरगावचे प्रसिद्ध लईराई मंदिर, तसेच काही घरे येत होती. परंतु, खाण खात्याने साळगांवकर शिपिंग कंपनीकडून हमीपत्र लिहून घेतले असून, त्यामुळे आता ही खाण सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

खाण खात्याचे संचालक नारायण गाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'मंदिराच्या कुंपणापासून १५० मीटरपर्यंत, लीज क्षेत्रात येणाऱ्या शेवटच्या घराच्या कुंपणापासून ५० मीटर अंतरापर्यंत कोणतेही खोदकाम कंपनीला करता येणार नाही. तसे हमीपत्र कंपनीकडून घेतले आहे. घरमालक, लईराई भक्तांनी भीती बाळगू नये.'

जाणार आहे. खाण ब्लॉकला ईसी व अन्य सर्व परवाने मिळालेले आहेत. आतापर्यंत १२ खाण ब्लॉकचा लिलाव केला, त्यातील मूळगाव येथे वेदांता कंपनीची व पिर्ण येथे फोमेंतोची अशा दोन खाणी सुरू झाल्या. शिरगाव, मयेंची सुरू होणारी तिसरी खाण ठरेल. आणखी काही संभाव्य खाण भाडेपट्ट्यांचे सर्वेक्षण चालू आहे. ई-लिलावाचा चौथा टप्पा या वर्षीच होईल, असे गाड यांनी सांगितले.

लिलाव झालेल्यांमध्ये कुडणे, करमळे खनिज ब्लॉक, सुर्ला सोनशी खनिज ब्लॉक, अडवालपल-थिवी खनिज ब्लॉक, कुडणे खनिज ब्लॉक-२, थिवी-पीर्ण खनिज ब्लॉक, सांगेतील काले खाण ब्लॉक, मूळगाव खाण ब्लॉक, मोंत द शिरगाव ब्लॉक आदींचा समावेश आहे.

 

Web Title: excavation only after 150 meters from the fence of lairai temple company guarantee letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.