शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वीज समस्येमुळे इन्व्हर्टर व्यावसायिकांची चांदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 11:26 IST

गोव्यात वीज पुरवठ्याची समस्या वाढू लागली आहे. विविध भागांमधून त्याविषयी तक्रारी वाढत आहेत. अशावेळी इन्व्हर्टर विकणारे आणि ते घरी किंवा कार्यालयात बसवून कार्यान्वित करणाऱ्या व्यावसायिकांची चांदी झाली आहे.

ठळक मुद्देगोव्यात वीज पुरवठ्याची समस्या वाढू लागली आहे. विविध भागांमधून त्याविषयी तक्रारी वाढत आहेत.इन्व्हर्टर विकणारे आणि ते घरी किंवा कार्यालयात बसवून कार्यान्वित करणाऱ्या व्यावसायिकांची चांदी झाली आहे. बार्देश, सत्तरी, सांगे, डिचोली, फोंडा आणि तिसवाडी या सहा तालुक्यांमध्ये वीज पुरवठ्याविषयी जास्त तक्रारी येत आहेत.

पणजी - गोव्यात वीज पुरवठ्याची समस्या वाढू लागली आहे. विविध भागांमधून त्याविषयी तक्रारी वाढत आहेत. अशावेळी इन्व्हर्टर विकणारे आणि ते घरी किंवा कार्यालयात बसवून कार्यान्वित करणाऱ्या व्यावसायिकांची चांदी झाली आहे.

बार्देश, सत्तरी, सांगे, डिचोली, फोंडा आणि तिसवाडी या सहा तालुक्यांमध्ये वीज पुरवठ्याविषयी जास्त तक्रारी येत आहेत. वीज मंत्रिपदाचा ताबा निलेश काब्राल या भाजपा नेत्याने काही महिन्यांपूर्वी घेतला आहे. आपल्याला फोनवरून तक्रार कळवा, आपण लगेच वीज पुरवठय़ात सुधारणा करून घेईन, असे मंत्री काब्राल यांनी जाहीर केले. वीज समस्येने हैराण होऊन अनेक लोक त्यांना संदेश पाठवतात. काब्राल यांच्याकडून काही तक्रारींची तातडीने दखलही घेतली जाते. मात्र प्रत्येकवेळी वीज पुरवठय़ात सुधारणा होते असे मुळीच नाही. 

पावसाळ्यापूर्वी अनेक भागांत शट डाऊन जाहीर करून वीज खात्याच्या यंत्रणेने सुधारणा काम केले होते. जुने कंडक्टर्स बदलण्याचेही काम केले. रस्त्यांवरील वीज दिवेही बदलण्यात आले.  मात्र जरा पाऊस किंवा वारा आला की, ग्रामीण गोव्यातील वीज पुरवठा खंडीत होतो. बार्देश तालुक्यातील अंजुणे पंचायत क्षेत्रातीलही लोक अशा समस्येला कंटाळले आहेत. केपे, सत्तरी, सांगे, काणकोण या चार तालुक्यांमधील बहुतेक भाग हे दुर्गम अशा ठिकाणी आहेत. बरीच लोकवस्ती जंगल परिसरात आहे. तिथे कधी झाड मोडून पडल्याने तर कधी अन्य कोणते संकट आल्याने वीजप्रवाह खंडीत होत असतो. पणजीसारख्या परिसरात ट्रान्सफॉर्मर मध्यंतरी निकामी झाले होते. तिसवाडीतील ताळगाव, करंजाळे वगैरे भागांमध्ये वीज पुरवठय़ाची समस्या वारंवार निर्माण होते. वीज खंडीत झाल्याने मग पाणी पुरवठा थांबतो. यामुळे म्हापसा, डिचोली, ताळगाव, कदंब पठार व अन्य भागांतील लोक शासकीय कारभाराविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. अशावेळी जे व्यवसायिक इन्व्हर्टर विकतात त्यांचा धंदा तेजीत सुरू आहे. घरात इन्व्हर्टर  बसवला की, निदान काही पंखे व काही वीज दिवे कामी येतात म्हणून लोक इन्व्हर्टर बसवून घेऊ लागले आहेत.

 

टॅग्स :electricityवीजgoaगोवाBJPभाजपा