Eknath Shinde: "सहकारी आमदारच नव्हे तर तमाम महाराष्ट्र आनंदी",एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 16:15 IST2022-07-01T16:15:08+5:302022-07-01T16:15:29+5:30
Eknath Shinde: बाळासाहेब ठाकरेंच्या सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद मिळाले याबद्दल माझे सहकारी आमदारच नव्हे तर तमाम महाराष्ट्र आनंदी असल्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde: "सहकारी आमदारच नव्हे तर तमाम महाराष्ट्र आनंदी",एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
पणजी - बाळासाहेब ठाकरेंच्या सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद मिळाले याबद्दल माझे सहकारी आमदारच नव्हे तर तमाम महाराष्ट्र आनंदी असल्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
शिंदे सध्या सेनेच्या बंडखोर गटासोबत गोव्यात आहेत. ५0 आमदारांमुळे महाराष्ट्र हा दिवस पाहू शकला, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेला जी कामे अपेक्षित आहेत ती सर्व मी करणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाला मी न्याय देईन. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांचे ध्येय पुढे नेईन. मंत्रिमंडळ विस्तारात कोणाकोणाचा समावेश असेल असे विचारले असता शिंदे म्हणाले की, सहकाºयांशी चर्चा करुनच पुढील धोरण ठरविले जाईल.