शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणात चर्चची मक्तेदारी संपुष्टात

By admin | Updated: June 12, 2015 00:45 IST

पणजी : राज्याच्या शिक्षण क्षेत्रात गेली अनेक वर्षे चर्च संस्था आपली मक्तेदारी दाखवत असली, तरी अलीकडे हिंदू

पणजी : राज्याच्या शिक्षण क्षेत्रात गेली अनेक वर्षे चर्च संस्था आपली मक्तेदारी दाखवत असली, तरी अलीकडे हिंदू व्यवस्थापनांच्या शाळांचा प्रभाव वाढू लागल्याने आता ती मक्तेदारी जवळजवळ संपुष्टात येऊ लागली आहे. यातूनच चर्च संस्थेचा शिक्षण खात्याविरुद्ध प्रथमचउघडपणे संघर्ष सुरू झाला आहे.मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रिपदी असताना चर्च संस्थेच्या शाळांबाबत पक्षपात केला नाही. त्यामुळेच अल्पसंख्याकांच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना शासकीय अनुदान सुरू राहिले. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही मुख्यमंत्री बनल्यानंतर कधी डायोसेझनच्या विद्यालयांना दुखावले नाही. आमदार कायतू सिल्वा तसेच ग्लेन टिकलो यांनी त्यांच्या मतदारसंघात डासोयेझनची शाळा सुरू व्हावी म्हणून शिक्षण खात्याकडे अर्ज केले व खात्याने लगेच ते मंजूरही केले. केपे येथे डॉन बॉस्को संस्थेने कृषी महाविद्यालय सुरू करण्यासाठी अर्ज केला होता. तो अर्ज शिक्षणमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांकडे पोहोचला, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तेथील फादरचा किंवा प्राचार्यांचा चेहराही न पाहता परस्पर तो अर्ज मंजूर केला व डॉन बॉस्कोला कृषी महाविद्यालय मिळाले.चर्च संस्थेच्या डायोसेझन मंडळाने मुख्यमंत्र्यांना येऊन न भेटता थेट शिक्षण खात्याविरुद्ध सर्व पक्षीय ख्रिस्ती आमदार आणि सरकारच्या दोघा मंत्र्यांना संघटित केल्याने सरकार दुखावले गेले आहे.ख्रिस्ती मंत्री, आमदारांनी सरकारच्या शैक्षणिक भूमिकांविरुद्ध आव्हानात्मक भूमिका घेतल्याने सत्ताधारी भाजपलाही आश्चर्याचा धक्काबसला आहे.(खास प्रतिनिधी)