लक्ष्मी नारायण मंदिरात ड्रेसकोड लागू; नियमांचे उल्लंघन करून मंदिरात प्रवेश नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 09:56 IST2026-02-06T09:56:29+5:302026-02-06T09:56:46+5:30

मंदिरातील पावित्र्य, सात्विकता अबाधित रहावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

dress code enforced in shree lakshmi narayan mandir mapusa no entry into the temple in violation of rules | लक्ष्मी नारायण मंदिरात ड्रेसकोड लागू; नियमांचे उल्लंघन करून मंदिरात प्रवेश नाही

लक्ष्मी नारायण मंदिरात ड्रेसकोड लागू; नियमांचे उल्लंघन करून मंदिरात प्रवेश नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिराच्या व्यवस्थापनाने मंदिरात प्रवेश करणाऱ्या सर्व भाविकांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे काटेकोर पालन करण्याचा निर्णय मंदिर समितीने ठरवले आहे. नियमांचे उल्लंघन करून मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही. मंदिरातील पावित्र्य, सात्विकता अबाधित रहावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

म्हापशात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लक्ष्मी नारायण मंदिरात दर्शनासाठी दररोज तसेच शुक्रवारी भक्तांची गर्दी असते. रात्री मंदिरात भजनाचा कार्यक्रम असतो. वाढती गर्दी लक्षात घेऊन समितीने ड्रेसकोडचा निर्णय घेतला आहे.

ड्रेस कोडच्या नियमानुसार भारतीय संस्कृतीनुसार पूर्ण कपडे परिधान करण्याची सक्ती करण्यात आली आहे. तोकड्या कपड्यांवर विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शॉर्ट्स, मिनी स्कर्ट, स्लिव्हलेस टॉप, लो वेस्ट जीन्स आणि आखूड टप्प्यांचे टी शर्ट परिधान करुन येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. हा निर्णय पुरुष, महिलांनाही लागू असेल अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष प्रशांत कामत यांनी दिली. मंदिराचे पावित्र्य अबाधीत राहण्यासाठी निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, यापूर्वी फोंडा तालुक्यातील काही मंदिरात तसेच राज्यातील इतरही भागातील मंदिरात प्रवेश करणाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.
 

Web Title : लक्ष्मी नारायण मंदिर में ड्रेस कोड लागू; प्रवेश प्रतिबंधित

Web Summary : म्हापसा के लक्ष्मी नारायण मंदिर में सभी भक्तों के लिए ड्रेस कोड लागू। मंदिर की पवित्रता बनाए रखने के लिए शॉर्ट्स, मिनी स्कर्ट, स्लीवलेस टॉप या लो-वेस्ट जींस पहनने वालों को प्रवेश नहीं मिलेगा। यह नियम पुरुषों और महिलाओं दोनों पर लागू होता है।

Web Title : Dress Code Implemented at Laxmi Narayan Temple; Entry Restricted

Web Summary : Laxmi Narayan Temple in Mapusa enforces a dress code for all devotees. Entry will be denied to those wearing shorts, mini skirts, sleeveless tops, or low-waist jeans, in an effort to maintain the temple's sanctity. The rule applies to both men and women.