शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

रिवणमधील वाद चिघळला

By admin | Updated: July 16, 2014 01:24 IST

मडगाव/रिवण : ‘त्या’ एचआयव्हीबाधित २३ विद्यार्थ्यांना रिवण येथील फातिमा हायस्कूलमध्ये प्रवेश देण्यावरून निर्माण झालेल्या वादाने आता वेगळे वळण घेतले आहे.

मडगाव/रिवण : ‘त्या’ एचआयव्हीबाधित २३ विद्यार्थ्यांना रिवण येथील फातिमा हायस्कूलमध्ये प्रवेश देण्यावरून निर्माण झालेल्या वादाने आता वेगळे वळण घेतले आहे. या मुलांना शाळेत प्रवेश दिल्यामुळे १६ विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश दाखले (लिव्हिंग सर्टिफिकेट) काढून घेतल्याने शिक्षण खात्यासमोर पेच निर्माण झाला आहे. आणखी १0 पालकांनी आपल्या मुलांना शाळेतून काढण्याची तयारी ठेवली असून या संदर्भात अर्जही केले आहेत. वरील १६ पालकांनी केपेतील होलीक्रॉस इन्स्टिट्यूटमध्ये मुलांना प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. फातिमा हायस्कूलच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, सोमवारपर्यंत १९ पालकांनी आपल्या मुलांचे नाव शाळेतून काढून घेण्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी १६ मुलांची लिव्हिंग सर्टिफिकेट्स आज मंगळवारी घेण्यात आली. या १६ विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी स्थानिक असून इतर विद्यार्थी बाहेरून आलेल्या कामगारवर्गाचे आहेत. अशा परिस्थितीत मंगळवारी आणखी ७ स्थानिक पालकांनी आपल्या मुलांना शाळेतून काढण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. अशा पालकांची संख्या ४0वर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात अधिकृत माहिती मिळविण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक फा. जेरी फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य जुझे आफोन्सो यांनी वृत्ताला दुजोरा दिला. काही पालकांनी आपल्या मुलांना शाळेतून काढले आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)