आघाडीवरून काँग्रेसमध्येच मतभेद; पाटकर, विरियातो यांच्यावर वीरेश यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:34 IST2026-02-20T11:34:27+5:302026-02-20T11:34:41+5:30

निवडणूक झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांमध्ये विरोधाभास दिसून येत आहे. 

differences within congress over leadership viresh borkar slams amit patkar and captain viriato fernandes | आघाडीवरून काँग्रेसमध्येच मतभेद; पाटकर, विरियातो यांच्यावर वीरेश यांचा हल्लाबोल

आघाडीवरून काँग्रेसमध्येच मतभेद; पाटकर, विरियातो यांच्यावर वीरेश यांचा हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :काँग्रेसचे दक्षिण गोवा खासदार कॅप्टन विरियातो फर्नाडिस यांनी नुकतेच आघाडीविषयी जे विधान केले, यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये आघाडीच्या मुद्द्यावरून पुन्हा मतभेद असल्याचे सिद्ध झाले, अशी टीका आरजीचे आमदार विरेश बोरकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

वीरेश म्हणाले की, 'जिल्हा पंचायत निवडणूक समितीत कॅप्टन विरियातो हे सदस्य होते. त्यावेळी अमित पाटकर यांच्यासह त्यांनी आघाडीला विरोध केला आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवून विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला होता; पण जेव्हा त्यांचा पराभव झाला तेव्हा त्यांची विधाने बदलली आहेत.
बोरकर म्हणाले की, निवडणूक झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांमध्ये विरोधाभास दिसून येत आहे. 

कॅप्टन विरियातो यांना वाटते की काँग्रेस स्वबळावर २७ जागा मिळवू शकते. त्यांची तशी विधाने आहेत. त्यांनी नेहमीच आमचा विरोध केला आहे. त्यांना जर एवढेच आघाडीबाबत वाटते तर मग ते आघाडीसाठी तयार नसल्याचे अजूनही का सांगत नाहीत? लोकांच्या मनात आहे की विरोधकांनी आघाडी करावी; पण काँग्रेसलाच मनापासून आघाडी करायची नाही.'

बोरकर म्हणाले, 'काँग्रेसने पक्षाची आघाडीबाबतची भूमिका स्पष्टपणे जनतेसमोर मांडली पाहिजे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये. अमित पाटकर हे अशा व्यक्तीच्या प्रभावाखाली आहेत ज्यांना आघाडी नको आहे. आम्ही युरी आलेमाव आणि एल्टन डिकोस्ता यांच्या संपर्कात आहोत. मात्र, त्यांनाही पक्षाचा निर्णय व निर्देशांचे पालन करावे लागते,' असेही बोरकर यांनी यावेळी सांगितले. 

दरम्यान, यूके दौऱ्याबाबत बोरकर म्हणाले की, 'हा १९ दिवसांचा अभ्यास दौरा होता. याकाळात मी तेथे वास्तव्यास व कार्यरत गोमंतकीय नागरिकांना भेटलो. संसदेचे अधिवेशन उपस्थित राहून गोमंतकीय कौन्सिलर व विरोधी पक्षनेत्यांशी संवाद साधला.

मी किंवा युरी एकट्याने निर्णय घेऊ शकत नाही : अमित पाटकर

काँग्रेस हा लोकशाही पद्धतीने चालणारा पक्ष असून युतीबाबतचे निर्णय सामूहिकरीत्या घेतले जातात. मी किंवा युरी एकट्याने कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. कोणताही एकतर्फी निर्णय होणार नाही याची काळजी घेतली जाते, असे मत काँगेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केले.

पाटकर यांनी फोंडा मतदारसंघातील संभाव्य पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका स्पष्ट करत सांगितले की, गोवा फॉरवर्ड पक्ष हा काँग्रेसचा निवडणूकपूर्व सहयोगी असून त्यांनी फोंड्यात आम्हाला पूर्ण पाठिंब्याचे आश्वासन दिले. इतर राजकीय पक्षांनीही भूमिका स्पष्ट करावी. फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणूक काँग्रेस पूर्ण ताकदीने निवडणूक लढवेल आणि काँग्रेसचा उमेदवार निश्चित विजयी होईल, असा विश्वासही पाटकर यांनी व्यक्त केला.

 

Web Title : गठबंधन पर कांग्रेस में कलह; वीरेश ने पाटकर, विरियातो की आलोचना की।

Web Summary : कांग्रेस में गठबंधन को लेकर मतभेद सामने आए, विधायक वीरेश बोरकर ने कैप्टन विरियातो और अमित पाटकर के बदलते रुख की आलोचना की। कांग्रेस को भ्रम से बचते हुए अपनी स्थिति स्पष्ट करनी चाहिए। पाटकर ने गठबंधन पर सामूहिक निर्णय लेने पर जोर दिया, आगामी उपचुनाव के लिए गोवा फॉरवर्ड से समर्थन पर प्रकाश डाला।

Web Title : Congress infighting over alliance; Veeresh criticizes Patkar, Viriato.

Web Summary : Differences within Congress surface regarding alliances, says MLA Viresh Borkar, criticizing Captain Viriato and Amit Patkar's shifting stances. Congress must clarify its position, avoiding confusion. Patkar emphasizes collective decision-making on alliances, highlighting support from Goa Forward for the upcoming by-election.