शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

गोव्यात सोशल मीडियावरुन भाजपाची बदनामी: भाजपयुवा मोर्चातर्फे स्थानिक काँग्रेस नेत्यावर पोलिसांत तक्रार

By सूरज.नाईकपवार | Updated: November 22, 2023 17:35 IST

मडगाव पोलिसांनी कुतिन्हो यांना आज दुपारी १२ वाजता पोलीस स्थानकात हजर राहण्यासाठी समन्स पाठविला होते. त्यानुसार ते पोलिस ठाण्यात हजरही राहिले.

मडगाव: सोशल मीडिया Whatsapp ग्रुपच्या माध्यमातूम भाजपाचे नाव बदमान केल्याचा दावा करुन गोवा राज्य भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे येथील स्थानिक काँग्रेसचे नेते साव्हियो कुतिन्हो यांच्या विरुद्ध मडगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. याविषयी मडगाव पोलिसांनी कुतिन्हो यांना आज दुपारी १२ वाजता पोलीस स्थानकात हजर राहण्यासाठी समन्स पाठविला होते. त्यानुसार ते पोलिस ठाण्यात हजरही राहिले.

आपल्यावरील सर्व आरोपाचे कुतिन्हो यांनी खंडन केले आहे. मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकात शुल्क आकारणीत जो घोटाळा झाला आहे तो आपण उघड केल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घोटाळयाची सरकारने चौकशी करावी अथवा आम्ही योग्य त्या ठिकाणी त्यावर दाद मागू असेही ते म्हणाले.कोकण रेल्वे स्थानकावर गाड्या प्रवेश करण्यासाठी असलेल्या टोल नाक्यावर भाजपचे काही पदाधिकारी स्टेशन कंपाउंडमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाकडून "प्रवासी कर" म्हणून २० रुपये वसूल करत आहेत. असे यावेळी कुतिन्हो यांनी १७ नोव्हेंबर रोजी या ठिकाणी केलेल्या आंदोलनावेळी सांगितले होते. 

२१ नोव्हेंबर रोजी साव्हियो कुतिन्हो यांनी पुन्हा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसमवेत मडगाव रेल्वे स्थानकाच्या टोल बूथजवळ पुन्हा आंदोलन केले होते. आणि यावेळीही त्यांनी पैसे वसूल करण्यात भाजपच्या कार्यकर्त्याचा समावेश असल्याचे म्हटले होते. या प्रकरणाचा मजकूर कुतिन्हो यांनी व्हॉट'सअँप ग्रुप मध्ये व्हायरल केला होता. या प्रकरणी भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष अभिषेक काकोडकर यांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे.

साव्हियो कुतिन्हो यांनी या विषयावर स्पष्टीकरण देताना सांगितले की भाजपा पक्षाच्या नावाची बदनामी केल्याबद्दल भाजपा युवा मोर्चाने पोलीस तक्रार दाखल केली होती म्हणून मला मडगाव पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. मला माहीत नाही की मी तिथे पक्षाचे नाव कसे बदनाम केले. भाजपा पक्षाचे एक पदाधिकारी सत्यविजय नाईक हे कोकण रेल्वे स्टेशनवर बेकायदेशीरपणे टोल वसूल करत होते. ही बाब कोकण रेल्वेच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यांनी सत्यविजय नाईक यांच्या नावावर असलेले साहित्य आणि बार कोड आकारला आहे, तर कंत्राट एका उमिया एंटरप्राइझने घेतले आहे . मी सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी सत्यविजय नाईक यांच्याकडून लुटलेले पैसे परत मिळवून देणार आहे अन्यथा आम्ही पोलीस तक्रार दाखल करणार असे ते म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस