स्वत:च्या पोटात चाकू खुपसून घेतलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

By सूरज.नाईकपवार | Updated: September 13, 2023 17:29 IST2023-09-13T17:28:36+5:302023-09-13T17:29:26+5:30

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे मयताला गेल्या अनेक वर्षांपासून दारूचे व्यसन होते

Death of an old man who stabbed himself in the stomach | स्वत:च्या पोटात चाकू खुपसून घेतलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

स्वत:च्या पोटात चाकू खुपसून घेतलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

सूरज नाईकपवार

मडगाव : स्वत:च पोटावर चाकू भोसकून घेतल्याने गंभीर जखमी झालेल्या एका ७३ वर्षीय वृध्दाचा गोमेकॉत मृत्यू झाला. गोव्यातील सासष्टी तालुक्यातील बेलोय नुवे येथे वरील घटना घडली.  मिनिनो डिसिल्वा असे मयताचे नाव आहे. सोमवार, ११ रोजी मिनिनो याने स्वयंपाक घरातील चाकूने आपल्या पोटावर वार करुन घेतले होते. जखमी अवस्थेत प्रथम त्याला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले, नंतर त्याला गोमेकॉत पाठवून देण्यात आले होते. तेथील आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार चालू होते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे मयताला गेल्या अनेक वर्षांपासून दारूचे व्यसन होते. मागच्या सात दिवसांपूर्वी त्याने दारु सोडली होती. अनैसर्गिक मृत्यू म्हणून मायणा कुडतरी पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक अरुण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत वेळीप पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Death of an old man who stabbed himself in the stomach