शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

नृत्य पार्ट्यांच्या विरोधात न्यायालयात धाव

By admin | Updated: December 26, 2014 02:10 IST

अंतरिम स्थगितीची मागणी : नियोजित वेळी दोन्ही पार्ट्या करण्यास मनाई करा

पणजी : सुपरसोनिक आणि सनबर्न पार्ट्यांचे गोव्यात बेकायदेशीरपणे आयोजन केल्याचा दावा करून काँग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात धाव घेतली आहे. नियोजित वेळी दोन्ही पार्ट्या करण्यास मनाई करण्याचा अंतरिम आदेश देण्यात यावा, अशी मागणी त्यात केली आहे. वागातोर येथे २७ ते २९ डिसेंबर २०१४ या दरम्यान पर्सेप्ट ग्रुपतर्फे आयोजित सनबर्न पार्टीसाठी आणि कांदोळी येथे २७ ते ३० डिसेंबर या दरम्यान होणाऱ्या वायाकॉमतर्फे होणाऱ्या सुपरसोनिक पार्टीसाठी अद्याप सरकारने परवानगी दिली नसली तरी आयोजकांतर्फे जय्यत तयारी सुरू असल्याचे न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे. अद्याप आयोजकांकडून वाणिज्य कर, मनोरंजन कर आणि इतर कोणत्याही स्वरूपाचा कर भरलेला नाही, तसेच आवश्यक परवानेही घेतलेले नाहीत. सरकारनेही या दोन्ही पार्ट्यांना आतापर्यंत परवानगी दिलेली नाही. या पार्ट्यांसाठी सुरक्षा देणे शक्य होणार नसल्याचे पोलिसांनीही सरकारला पत्र लिहिले आहे, असे असताना बिनदरकारपणे पार्ट्यांच्या तिकिटांची विक्री सुरू आहे. ही विक्री बेकायदेशीर आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. आयोजकांनी केलेल्या तिकीट विक्रीचा हिशेब गुलदस्त्यात आहे. तसेच त्यांनी हिशेब दिला तरीही त्याची सत्यता पडताळून पाहाण्याची यंत्रणा सरकारकडे नाही. म्हणून आयोजकांकडून कराचा भाग हा पार्ट्या साजऱ्या करण्यापूर्वीच फेडून घेणे आवश्यक असल्याचे याचिकेत म्हटले आहे. मुख्याधिकारी, पर्यटन खाते, वाणिज्य खाते, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, गृहसचिव, किनारी नियम व्यवस्थापन प्राधिकरण हणजुणे आणि कांदोळी यांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)