अट्टल गुन्हेगार अन्वर शेखची गोव्यात हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 03:10 PM2019-12-28T15:10:14+5:302019-12-28T15:10:18+5:30

गोव्याचा अट्टल गुन्हेगार अन्वर शेख (२४) याचा शुक्रवारी रात्री दक्षिण गोव्यातील मडगाव येथील मोतीडोंगरावर हत्या करण्यात आली आहे.

Criminal Anwar Sheikh murdered in Goa | अट्टल गुन्हेगार अन्वर शेखची गोव्यात हत्या

अट्टल गुन्हेगार अन्वर शेखची गोव्यात हत्या

googlenewsNext

मडगाव: गोव्याचा अट्टल गुन्हेगार अन्वर शेख (२४) याचा शुक्रवारी रात्री दक्षिण गोव्यातील मडगाव येथील मोतीडोंगरावर  हत्या करण्यात आली आहे.  पुर्ववैमन्यस्यातून खुनाची ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी नागराज नायकर याला अटक केली असून, अन्य दोघेजण फरार आहेत. मोतीडोंगर येथे हत्येची घटना घडल्यानंतर संवेदनशील असलेल्या भागात भितीचे वातावरण पसरले आहे.

मोतीडोंगर येथील रुपा बारजवळ काल शुकवारी रात्री ९ च्या दरम्यान खुनाची ही घटना घडली. मारेकऱ्यांनी अन्वर व त्याचा मित्र सूरज चारी या दोघांवर हल्ला चढविला. फुटलेले वॉश बेसीन, दगड व बेसबॉल बॅटने अन्वरच्या डोक्यावर वार करण्यात आले. रक्ताच्या थारोळयात अन्वर निपचीत पडला. सूरज यालाही मारहाण करण्यात आली, त्यात तोही जखमी झाला.अन्वर मृत पावल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळाहून पळ काढला. जागेश मेटटी, नागराज नायकर व मंजू मेटटी अशी संशयितांची नावे असून, ते तिघेही मोतीडोंगर येथील रहिवाशी आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपुर्वी अन्वरला काहीजणांकडून मारहाण करण्यात आली होती. मारेकरी शुक्रवारी एका बारमध्ये असल्याची माहिती मिळाल्यनंतर अन्वर आपल्या मित्रासमवेत तेथे गेला. यावेळी त्याच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. अन्वर हा सराईत गुन्हेगार होता. राज्यातील विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर घरफोडया व अन्य स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. त्याला रासुकाखाली तसेच तडीपार करण्यासंबधी शिफारस करण्यात आली होती अशी माहिती दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली. 

खुनाची घटना घडल्यानतंर मडगाव पोलीस विभागाचे उपअधिक्षक सेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला. भारतीय दंड संहितेंच्या ३0२ कलमाखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले असून, पुढील पोलीस तपास चालू आहे.

Web Title: Criminal Anwar Sheikh murdered in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.