नगरसेवकपुत्राला चार दिवसांची पोलिस कोठडी; चार पीडितांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:33 IST2026-03-24T13:32:27+5:302026-03-24T13:33:35+5:30

सेक्स स्कँडलची व्याप्ती वाढली

corporator son remanded in police custody for four days in scandal police succeed in identifying four victims | नगरसेवकपुत्राला चार दिवसांची पोलिस कोठडी; चार पीडितांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश

नगरसेवकपुत्राला चार दिवसांची पोलिस कोठडी; चार पीडितांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश

लोकमत न्यूज नेटवर्क, केपे : कुडचडे परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या सेक्स स्कँडल प्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित सोहम सुशांत नाईक या युवकाविरोधात पोलिसांनी 'पोक्सो' आणि 'गोवा बाल कायदा' अंतर्गत कठोर कलमे लागू केली. दरम्यान, सोहमॉला केपे प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. या प्रकरणी आणखी काही संशयितांना ताब्यात घेतले जाईल अशी शक्यता आहे.

सोमवारी सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यासह कार्यकर्ते आणि स्थानिकांनी कुडचडेच्या पोलिस निरीक्षकांना घेराव घालत जाब विचारला. संशयित हा नगरसेवक सुशांत नाईक यांचा मुलगा आहे. त्याच्याविरोधात कडक कलमे लावली नसल्याचा जाब विचारला.

गेल्या काही दिवसांपासून परिसरात या स्कँडलबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. संशयिताकडून मोठ्या प्रमाणावर युवतींचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल होऊनही पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. याबाबत रविवारी कुडचडेतील नगरसेवकांनी पोलिसांची भेट घेऊन ४८ तासांत चौकशी पूर्ण करून कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा आणि बाजार बंद ठेवण्याचाही इशारा दिला. यानंतर तातडीने तपासाने वेग घेतला. रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी माधेगाळ-काकोडा येथील संशयित सोहम नाईक या तरुणाला ताब्यात घेतले. मात्र, संशयिताविरोधात कडक कलमे लावली नसल्याबद्दल लोकांमध्ये रोष होता.

सखोल तपास सुरू: उपअधीक्षक शिरोडकर

दरम्यान, पोलिस उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांनी संशयित सोहम नाईकविरुद्ध प्राप्त झालेल्या प्राथमिक पुराव्यांच्या आधारे 'पोक्सो' आणि 'गोवा चिल्ड्रन्स अॅक्ट' नुसार गुन्हे नोंदवण्यात आले असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, 'पीडितांनी न घाबरता पुढे यावे. त्यांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल. या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने केला जाईल. सेक्स रॅकेटमध्ये आणखी कोणाचे लागेबांधे आहेत, याचा शोध घेतला जात आहे.

'बायलांचो एकवोट'कडून चिंता व्यक्त

कुडचडे येथे उघडकीस आलेल्या कथित सेक्स स्कँडलप्रकरणी 'बायलांचो एकवोट' या संघटनेने चिंता व्यक्त केली असून, हे राज्यात वाढत्या संकटाचे लक्षण असल्याचे म्हटले आहे. संघटनेने या प्रकरणातील तपासासाठी पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत आयटी कायद्यांतर्गत झालेल्या अटकेबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र, या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता अधिक कठोर कारवाईची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

सोक्षमोक्ष लावावा, मुख्यमंत्र्यांशी बोललोय : काब्राल

गेल्या काही दिवसांपासून मी केरळमध्ये निवडणुकीच्या कामात व्यस्त होतो. मात्र, याची माहिती मिळाल्यानंतर मी पोलिसांशी आणि मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी केली आहे' असे कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी सांगितले. ते म्हणाले की, घडलेली घटना चुकीची आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयितास अटक केली आहे. संबंधितावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. माझ्यावर केलेल्या टीकेकडे मी लक्ष देत नाही.

पोलिस निरीक्षक धारेवर

संशयित युवक सोहमविरोधात नोंदवलेल्या गुन्ह्यात पीडितांच्या संरक्षणासाठी कडक कायदेशीर कलमे लावण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. काल, सोमवारी या संशयिताविरोधात वेगळी कलमे लावल्याचा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, गोवा फॉरवर्डचे नेते व आमदार विजय सरदेसाई, दुर्गादास कामत, विकास भगत, बायलांचो एकवोट संघटनेच्या आवदा व्हिएगस यांच्यासह स्थानिकांनी पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो यांची भेट घेऊन त्यांना धारेवर धरले. संशयितावर 'पोक्सो कायदा' आणि 'गोवा बाल कायदा' लागू करण्याची मागणी केली. आमदार सरदेसाई यांनी थेट पोलिस महासंचालकांना फोन केला. त्यानंतर पोलिसांच्या कारवाईने गती घेतली. यानंतर चार पीडितांची ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title : पार्षद पुत्र पुलिस हिरासत में; सेक्स स्कैंडल में पीड़ितों की पहचान हुई

Web Summary : एक पार्षद का बेटा नाबालिगों से जुड़े सेक्स स्कैंडल मामले में गिरफ्तार। पुलिस ने पोक्सो एक्ट और गोवा बाल अधिनियम लागू किया। चार दिन की पुलिस हिरासत मिली। सख्त कार्रवाई की मांग को लेकर प्रदर्शन हुए। संभावित व्यापक रैकेट में जांच जारी।

Web Title : Councilor's Son Gets Police Custody; Victims Identified in Sex Scandal

Web Summary : A councilor's son was arrested in a sex scandal case involving minors. Police invoked POCSO Act and Goa Children's Act. Four-day police custody granted. Protests erupted demanding strict action. Investigation continues into possible wider racket involvement.