Coronavirus : परदेशात अडकले हजारो गोमंतकीय खलाशी, घरच्यांना लागला घोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 05:23 AM2020-03-15T05:23:03+5:302020-03-15T05:23:57+5:30

सुमारे चाळीस हजार गोमंतकीय जहाजांवर काम करतात. अशा जहाजांवर काम करणे हा गोवेकरांसाठी पूर्वीपासूनचा रोजगाराचा पर्याय आहे.

Coronavirus: Thousands of Govekar sailors trapped overseas | Coronavirus : परदेशात अडकले हजारो गोमंतकीय खलाशी, घरच्यांना लागला घोर

Coronavirus : परदेशात अडकले हजारो गोमंतकीय खलाशी, घरच्यांना लागला घोर

Next

मडगाव ( जि. दक्षिण गोवा) : कोरोना विषाणूमुळे अनेक क्रुझ कंपन्यांनी कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी परदेशात हजारो गोमंतकीय खलाशी अडकले आहेत. ते घरी कधी परतणार याचा संबंधित कुटुंबीयांना घोर लागलेला आहे. सुमारे चाळीस हजार गोमंतकीय अशा जहाजांवर काम करतात.
अशा जहाजांवर काम करणे हा गोवेकरांसाठी पूर्वीपासूनचा रोजगाराचा पर्याय आहे. गोमंतकीय पीएनओ, वायकिंग, एमएससी, आरसीसीएल, कोस्टा, आयदा अशा नामांकित क्रुझ कंपन्यांत काम करतात. या सर्वच कंपन्यांनी
आपले कामकाज दोन महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला
आहे.
स्थिती सुधारली तरच या कंपन्या सुरू होणार आहेत. जर हा कालावधी वाढला तर अनेक गोवेकरांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे.

नवरदेव परदेशात... लग्न कसे करायचे ?
काही तरुण परदेशात अडकून पडल्याने त्यांची लग्नेही खोळंबलेली आहेत. सांगे-केपे परिसरात अशी तीन प्रकरणे आहेत. इतर ठिकाणीही अशी प्रकरणे असू शकतात.
कुडचडे येथील युवक कुवेतमध्ये अडकल्याने लग्नाचा मुहूर्त तो गाठू शकेल का, या चिंतेने त्याच्या कुटुंबीयांना ग्रासले आहे. केपेतील एका कुटुंबालाही लग्न लांबणीवर टाकावे लागले. कारण जहाजावर काम करणारा नवरदेव मस्कत विमानतळावर अडकून पडला आहे. सावर्डेतील एका कुटुंबावरही अशीच पाळी आली आहे.

तर कंपन्या दिवाळखोरीत?
दक्षिण अमेरिकेतच दोन हजारांच्या आसपास गोवेकर खलाशी अडकले आहेत. कामच नसल्याने शेकडोंच्या संख्येने गोवेकर गोव्यातही परतू लागलेत. जर परिस्थिती सुधारली नाही तर कित्येक क्रुझ कंपन्या दिवाळखोरीत जाऊ शकतात. तसे झाल्यास हजारो गोवेकरांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. कित्येकांनी कर्ज काढून या नोकºया स्वीकारलेल्या आहेत. त्यामुळे भविष्यात स्थिती गंभीर होऊ शकते.
- डिक्सन वाझ, अध्यक्ष,
गोवन सी फेअरर्स असोसिएशन

Web Title: Coronavirus: Thousands of Govekar sailors trapped overseas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.