Coronavirus Goa CM Pramod Sawant orders grocery stores to open SSS | Coronavirus : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर सोशल मीडियातून आश्चर्य आणि टीकाही!

Coronavirus : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर सोशल मीडियातून आश्चर्य आणि टीकाही!

सचिन कोरडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर अवघ्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे गुरुवारी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांन संपूर्ण लॉकडाऊनवर माघार घ्यावी लागली. जीवनाश्यक वस्तू पुरवण्यात सरकार अपयशी ठरल्यामुळे जनतेने सरकारला वेठीस धरले होते. वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी जी यंत्रणा तयार केली होती ती पूणंर्त: फोल ठरली. त्यामुळे सावंत यांनी शुक्रवारपासून भाजीपाला, दुध आणि किराणा दुकाने खुली केली. या निर्णयावर सोशल मीडीयातून मात्र आश्चर्य आणि टीकासुद्धा होत आहे.

गोवा हे छोटे राज्य असून जनतेला सोशल डिस्टंसिंग पाळता आले नाही. दोन दिवसही जनतेने कळ सोसली नाही. वस्तू मिळाल्या नाहीत म्हणून सरकारवर टीका सत्र सुरू झाले होते.  कोरोना हा महाभयंकर आजार असून त्याचे गांभीर्य जनतेने पाळले नाही. बऱ्याच ठिकाणी बाजाराचे स्वरुप होते. पोलिसांनाही लोक ऐकत नव्हते. युवक बिनकामी रस्त्यावर हिंडताना दिसले. नियमांचे प्रत्येक वेळी उल्लंघन झाले. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओतून तसे चित्र दिसत होते. कोरोनाला निमंत्रण देण्याचाच हा प्रकार सुरू होता. यावर सरकारच्या आदेशाला तिलांजली देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकारावर खंत व्यक्त केली. अखेर जनता कळ काढत नसल्याचे पाहून त्यांनी जीवनाश्यक वस्तूंची दुकाने 24 तास खुली करण्याचे जाहीर केले. आता लोकांना वस्तू मिळतील मात्र गर्दी न करण्याच्या सूचनाही त्यांनी पाळवा लागतील. अन्यथा गोव्यात कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका आहे.

दरम्यान, सरकाjच्या या निर्णयाचे सोशल मीडियातून आश्चर्य आणि टीकासुद्धा होत आहे. लोकांच्या असहकायार्मुळे मुख्यमंत्र्यांना हा निर्णय घ्यावा लागला.  सरकार शिस्त पाळण्यात अपयशी ठरले. सरकारला नियोजन करता आले नाही, असे एकाने म्हटले आहेत तर अधाशीपणे घेतलेला हा निर्णय आपल्याला विनाशाकडे नेईल, आता लोकांनी ठरवावे त्यांना जेवण पाहिजे की मरण, अशी प्रतिक्रिया उमेश फडते यांनी व्यक्त केली आहे.

गोव्याचे नामवंत डॉक्टर शेखर साळकर यांनी सुद्धा तीव्र प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी त्वरीत निर्णय मागे घ्यावा. लॉकडाउनला सर्व जनतेने सहकार्य करावे. गोवा हे छोटे राज्य असून कोरोनाचे संक्रमण लवकर होण्याचा येथे धोका आहे. आपण जीवंत राहिलो तरच आपल्याला खाता येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : प्रिय बाबा... पंतप्रधान मोदींनी शेअर केला लेकीचा ‘तो’ व्हिडीओ

Coronavirus : कोरोनाचा गुगल, फेसबुकला फटका; तब्बल 4400 कोटींचं नुकसान होण्याची शक्यता

Coronavirus: देशासाठी सदैव तत्पर! कोरोनाग्रस्तांसाठी CRPF चा पुढाकार, 33 कोटी 81 लाखांची केली मदत

Coronavirus : चिंताजनक! देशात एका दिवसात 7 जणांना गमवावा लागला जीव, कोरोनाग्रस्तांचा आकडा 700 वर

Coronavirus : भारताचे 'मिशन कोरोना'; 'या' राज्यात उभारणार देशातील सर्वात मोठं रुग्णालय

 

Web Title: Coronavirus Goa CM Pramod Sawant orders grocery stores to open SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.