शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
2
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
3
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
केंब्रिजमधून M. Phi, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
5
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
6
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
7
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
8
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
9
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
10
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
11
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
12
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
13
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
14
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
16
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण

गोव्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 202; नवे रुग्ण 71 आढळले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 8:58 PM

851 कोविड चाचण्यांचे अहवाल येणे बाकी

पणजी : राज्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या शनिवारी 202 झाली. सर्वात जास्त म्हणजे 71 कोरोना रुग्ण शनिवारी गोव्यात आढळले. मांगोरहीलला 62 रुग्ण आढळले. अजून 851 कोविड चाचण्यांचे अहवाल येणे बाकी आहे. राज्यातील कोरोनाचा हा कहर पाहून सरकारची आरोग्य यंत्रणाही धास्तावू लागली आहे.सरकारी यंत्रणोने मांगोरहीलला सर्वाच्या कोविद चाचण्या करण्याचे काम खूपच संथ केले आहे. मांगोरहीलच्या 1 हजार लोकांचे थ्रोट स्वॅब आरोग्य कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी घेतले होते. त्यानंतर जास्त लोकांची चाचणी केली गेली नाही. यापूर्वीच्याच चाचण्यांचे अहवाल आता येत आहेत. शनिवारी मांगोरहीलमध्ये 62 नवे कोविड रुग्ण आढळले. राज्यभर एकूण 2 हजार 311 कोविद चाचण्या शनिवारी करण्यात आल्या. त्यापैकी 1 हजार 389 अहवाल नकारात्मक आले. इतर अहवालांची सरकारला प्रतिक्षा आहे.मांगोरहीलला संख्या 170 शुक्रवारी मांगोरहीलला 26 कोरोना रुग्ण आढळले होते. आता तिथे एकूण संख्या 170 झाली आहे. अजून चाळीस टक्के लोकांच्या होणो बाकी आहे. मांगोरहीलला रुग्णसंख्या वाढतेय असे दिसू नये म्हणून सरकारने तिथे लोकांचे चांचण्यांसाठी नवे नमूने स्वीकारणो खूपच संथ केले आहे, अशी चर्चा काही मंत्र्यांमध्येही सुरू आहे. मांगोरहीलचे लोक सध्या बाहेर कुठे जाऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्यामुळे कोरोनाचा फैलाव गोव्याच्या अन्य भागात होणार नाही असेही काही लोकप्रतिनिधींना वाटते. बुधवारी मांगोरहीलला 42 रुग्ण आढळले होते.मडगावच्या कोविद इस्पितळाची क्षमता 230 आहे. तथापि, तिथे आताच 202 रुग्ण उपचार घेत आहेत. यामुळे सरकारला दुसरे पर्यायी इस्पितळ पहावेच लागेल. आतार्पयत म्हणजे सुरूवातीपासून एकूण 267 कोरोना रुग्ण गोव्यात आढळले व त्यापैकी 65 रुग्ण बरे झाले.नऊ रुग्ण मांगोरहील बाहेरीलजे 71 नवे रुग्ण आढळले, त्यापैकी नऊ रुग्ण हे बाहेरील आहेत. त्यांचा मांगोरहीलशी संबंध नाही. नऊपैकी तिघेजण दिल्लीहून विमानाने गोव्यात आले होते. तिघेजण रस्तामार्गे गोव्यात आले. या तिघांपैकी दोघे महाराष्ट्रातून आले तर एकटा कर्नाटकातून आला. लोक कोरोना रुग्ण सापडले म्हणून विविध गावांची नावे सध्या घेत आहेत. अफवाही बऱ्याच पिकत आहेत. बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळाच्या आयसोलेशन विभागात 12 संशयीत शनिवारी दाखल झाले. मात्र त्यांना कोरोना झालेला नाही.आरोग्य कर्मचारी जाईनात मांगोरहीलला यापूर्वी गेलेले काही आरोग्य कर्मचारी कोविद पॉङिाटीव झाल्याची चर्चा पसरल्यानंतर आता जास्त कर्मचारीच तिथे जायला शोधत नाहीत. मांगोरहीलला नव्या चाचण्या कमी होण्याचे तेही एक कारण असल्याचे सांगितले जाते. सरकार सध्या प्रसार माध्यमांर्पयत व्यवस्थित माहिती पोहचविण्याबाबत लपवाछपवी करतेय अशा प्रकारचा आरोप विरोधक करत आहेत. ज्या दिवशी जास्त कोरोना रुग्ण आढळतात, त्या दिवशी सरकार पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाऊ पाहत नाही. त्यामुळेच पत्रकार परिषद घेण्यास टाळाटाळ केली जाते. शनिवारी सायंकाळी आरोग्य सचिव पत्रकार परिषद घेतील असा संदेश आला होता. मात्र अचानक पत्रकार परिषद रद्द केली गेली. आरोग्य मंत्री बोलले तर सरकारमधील काहीजणांना राग येत असल्याने तेही बोलत नाहीत.ग्रामीण भागात चाचणी सत्तरी तालुक्यातील गुळेली व राज्यातील अन्य काही ग्रामीण भागांमध्ये सरकारी यंत्रणा जाऊन सध्या लोकांची रॅण्डम अशी कोविद चाचणी करून पाहत आहे. काही आरोग्य कर्मचाऱ्यांची जिथे घरे आहेत, त्या घरांच्या आसपासच्या लोकांचीही कोविड चाचणी केली जात आहे. ह्या सगळ्य़ा चाचण्या निगेटिव्हच आल्या आहेत. साखळीत एक फळ विक्रेता पॉझिटिव्ह आला अशी अफवा काहीजणांनी पसरवली होती. त्याची चाचणी प्रत्यक्षात पॉझिटिव्ह आलेली नाही.राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले तरी, लोकांनी शांत रहावे. गोव्याला सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार आवश्यक ती सगळी उपाययोजना करत आहे. गुळेली येथे लोकांचे नमूने घेऊन तपासणी केली जात आहे.- विश्वजित राणो, आरोग्य मंत्री

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या