'संविधान' हक्काबरोबर जबाबदारीही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 12:41 IST2025-11-27T12:40:17+5:302025-11-27T12:41:07+5:30
भाजपतर्फे पणजीत 'संविधान दिन कार्यक्रम

'संविधान' हक्काबरोबर जबाबदारीही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : संविधान म्हणजे नक्की काय आहे, त्याबाबत नव्या पिढीमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. संविधान म्हणजे केवळ हक्क नसून ती एक जबाबदारी आहे. 'संविधान बचाव' अशी मोहीम कांग्रेस राबवत असली तरी प्रत्यक्षात त्यांनी संविधाची हत्या केली आहे. संविधानाचा खरा आदर हा भाजप सरकारने केला असल्याचे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.
भाजपतर्फे पणजीत आयोजित 'संविधान दिन' कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, भाजपचे राष्ट्रीय नेते के. अन्नमलाई, तरुण चुग, मंत्री, आमदार, नेते व पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, की संविधानाचे पुस्तक हाती घेऊन संविधान बचाव अशी मोहीम कांग्रेसले राबवली. केवळ मोहीम राबवली म्हणून काही होत नाही. संविधानाचा खरा आदर हा भाजप सरकारने केला.
कलम ३७० रद्द करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखंड भारताचे स्वप्न साकार केले. वंचितांना न्याय देण्याचे काम खरे तर संविधानात नमूद आहे. त्याला जर कोणी विलंब केला असेल तर ते काँग्रेसने केला. संविधानाचे पुस्तक घेऊन फिरुन काहीच होत नाही. भाजपने संविधानचा आदर केला आहे. संविधान ही एक जबाबदारी आहे. म्हणजेच सरकारने काय करावे व लोकांनी काय कराते हे देखील समजून घ्यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.