शिमगोत्सवातून संस्कृतीचे संवर्धन: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 09:30 IST2026-03-13T09:30:14+5:302026-03-13T09:30:58+5:30

साखळीत शिमगोत्सव उत्साहात, परिसर स्वच्छतेसाठी केले आवाहन

conservation of culture through shimgotsav said cm pramod sawant | शिमगोत्सवातून संस्कृतीचे संवर्धन: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

शिमगोत्सवातून संस्कृतीचे संवर्धन: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : गोव्याची संस्कृती व परंपरा यांचे सदैव जतन व संवर्धन करण्याची प्रेरणा देणारा गावातील पारंपरिक शिमगोत्सव आज मोठ्या स्वरूपात सार्वजनिकरित्या साजरा होत आहे. सरकारही शिमगोत्सवाला व आपल्या संस्कृतीला मोठे पाठबळ देत आहे. आयोजित शिमगोत्सव २०२६ चे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी उत्सवात सहभागी होत असताना म्हटले की, सर्वांना आपली कला व संस्कृती राखत असतानाच हे राज्य ही सुंदर ठेवण्यासाठी योगदान द्यावे. आपण स्वतः कुठेही कचरा फेकून या राज्याची सुंदरता बिघडविणार नाही त्यासाठी शपथबद्ध व्हावे, असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर साखळीच्या नगराध्यक्षा सिद्धी प्रभू, पद्मिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा सुलक्षणा सावंत, उपनगराध्यक्ष दयानंद बोर्येकर, शिमगोत्सव समितीचे सचिव सिद्धेश काणेकर, खजिनदार गोविंद कामत, कार्यक्रम प्रमुख सुदेश काणेकर, नगरसेवक ब्रह्मानंद देसाई, यशवंत माडकर, दीपा जल्मी, रश्मी देसाई, आनंद काणेकर व इतरांची उपस्थिती होती.

संपूर्ण गोव्यासाठी सदैव प्रेरणादायी कार्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील शिमगोत्सवाच नव्हे तर कला व संस्कृती तसेच परंपरांचे जतन व्हावे यासाठी वेगवेगळ्या उत्सवांना सरकारचे मोठे पाठबळ दिले आहे. याच जोरावर आज गोव्यात सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना लोकांचा मोठा सहभाग दिसून येत आहे, असे यावेळी नगराध्यक्षा सिद्धी प्रभू यांनी स्वागतपर भाषणात म्हटले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून शिमगोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी ढोल वाजवून व श्रीफळ वाढवून शिमगोत्सवाचे उदघाटन केले. यावेळी लवू परवार, मुकूंद गावकर, नारायण परब, दयानंद बोर्येकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार केला. सूत्रसंचालन समीर प्रभू यांनी केले.

 

Web Title : शिमगोत्सव संस्कृति का संरक्षण करता है: मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने समर्थन पर जोर दिया।

Web Summary : मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने शिमगोत्सव का उद्घाटन किया और गोआ की संस्कृति और परंपराओं के लिए सरकार के समर्थन पर जोर दिया। उन्होंने नागरिकों से राज्य की सुंदरता और सांस्कृतिक विरासत को संरक्षित करने का आग्रह किया। कार्यक्रम में कई गणमान्य व्यक्तियों ने भाग लिया, और आयोजकों ने सांस्कृतिक कार्यक्रमों के लिए सरकार के समर्थन के प्रति आभार व्यक्त किया।

Web Title : Shimgo festival preserves culture: Chief Minister Pramod Sawant emphasizes support.

Web Summary : Chief Minister Pramod Sawant inaugurated the Shimgo festival, emphasizing the government's support for Goan culture and traditions. He urged citizens to preserve the state's beauty and cultural heritage. Various dignitaries attended the event, with organizers expressing gratitude for the government's backing of cultural events.