दहशतवादाशी लढण्यास सरकारला पाठिंबा : काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 12:56 IST2025-04-26T12:56:15+5:302025-04-26T12:56:15+5:30
या घटनेला कारणीभूत दहशदवाद्यांवर सरकारने कडक कारवाई करण्याची वेळ आली आहे.

दहशतवादाशी लढण्यास सरकारला पाठिंबा : काँग्रेस
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पेहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे देशभरात संताप व रोष व्यक्त होत आहे. या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी उत्तर गोवा व दक्षिण गोवा जिल्ह्यात मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला.
या घटनेला कारणीभूत दहशदवाद्यांवर सरकारने कडक कारवाई करण्याची वेळ आली आहे. आमच्या पक्षाचा यासाठी सरकारला पूर्ण पाठींबा असणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पाटकर यांनी केले. काँग्रेस हाऊज ते आजाद मैदान असे या मेणबत्ती मोर्चाचे स्वरुप होते.
पेहलगाममधील हल्ला हा खुप भयावक आणि अमानुष होता. देवाचा आशीर्वाद आमच्यावर असल्याने हल्ल्याच्या ठिकाणीच फिरायला गेलेले सुमारे ५० गोमंतकीय सुरक्षीत राहीले. पण यापुढे असे हल्ले आम्ही खपवून घेतले जाणार नाही, असा संदेश सरकारने दहशतवाद्यांना द्यावा, असे अॅड. अमित पाटकर यांनी यावेळी सांगितले.
कठोर कारवाई करा
या मेणबत्ती मोर्चाला अॅड. अमित पाटकर यांच्यासोबत काँग्रेस महिला मोर्चा अध्यक्ष अॅड. प्रतिक्षा खलप, मीडीया सेल प्रमुख अमरनाथ पणजीकर व इतर पदाधिकारी, कार्यकर्ता उपस्थित होते.
आत्म्यावर हल्ला : खलप
काँग्रेस महिला अध्यक्ष अॅड. प्रतिक्षा खलप यांनी यावेळी सांगितले की, हा हल्ला पर्यटकांवर नसून देशाच्या आत्म्यावर केला आहे, देशातील एकात्मेवर केला आहे. पण या घटनेनंतर आमचा एकात्मता अधिक बळकट झाली असून, ही तोडण्याची क्षमता कुणाचकडे नाही, हे या दहशतवाद्यांनी देखील लक्षात घ्यावे. मरण पावलेल्यां कुटूंबियासोबत आम्ही नेहमीच असणार आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी ही देवाकडे प्रार्थना आहे.
राज्यातील सुरक्षतेबाबत सरकारने गंभिर्याने पाहावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले.