शहरं
Join us  
Trending Stories
1
'गजा मारणेची पार्श्वभूमी माहीत नव्हती, आमची झालेली भेट केवळ अपघात'; निलेश लंकेंचे स्पष्टीकरण
2
अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार
3
“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार
4
सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले
5
“संजय राऊतांनी शिवसेनेचे दोन तुकडे करुन दाखवले, राज ठाकरेंवर बोलू नये”; मनसे नेत्यांचा पलटवार
6
RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले...
7
'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या
8
अमेरिकन रॅपर ड्रेक मालामाल! भारत-पाक वर्ल्ड कप सामन्यात सट्टात जिंकले ७ कोटी!!
9
शशांक केतकरच्या तक्रारीनंतर BMC ची तातडीने कारवाई, स्वच्छ केला परिसर; अभिनेता म्हणाला...
10
Human finger in ice cream in Mumbai: ज्या कंपनीच्या आईस्क्रिम कोनमध्ये सापडलं मानवी बोट, ती कंपनी आता म्हणते, "आम्ही तर आता.."
11
Mandira Bedi : "ते माझं घर चालवायला येणार नाहीत, दुःख आहे जे...."; पतीच्या निधनावर पहिल्यांदा बोलली मंदिरा
12
तो लॅपटॉप सोबतच ठेवतो अन् मॅच संपल्यावर ऑफिस काम करतो! सौरभ नेत्रावळकरची कमिटमेंट
13
अयोध्येला जाणाऱ्यांची संख्या घटली, स्पाइसजेटनं विमान सेवा बंद केली!
14
Fact Check: शपथविधी सोहळ्यात गडकरींनी PM मोदींना अभिवादन केले नाही? पाहा, दाव्यामागचे सत्य
15
लय भारी! WhatsApp वर आलं Zoom सारखं फीचर; ३२ लोकांना करता येणार Video कॉल
16
Review: खऱ्या नायकाच्या संघर्षाची 'गोल्ड'न स्टोरी, वाचा कसा आहे कार्तिकचा 'चंदू चॅम्पियन'
17
Fact Check : राष्ट्रगीत सुरू होतं आणि पंतप्रधान मोदी खुर्चीवर बसले?; जाणून घ्या 'सत्य'
18
गुरुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वृद्धी योग; वरदान काळ, तुमची रास कोणती?
19
तो फोन शेवटचा! मुलांना मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला अन्...; काळजात चर्र करणारी घटना
20
Sushant Singh Death Anniversary : सुशांतच्या बहिणीने शेअर केला थ्रोबॅक व्हिडीओ; म्हणाली - 'हा राजकीय अजेंडा...'

रमाकांत खलप अन् श्रीपाद नाईक लढताहेत शेवटची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2024 9:40 AM

भाजपच्या संघटनात्मक बळाचे आव्हान खलप पेलणार का?

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या तिकिटावर सलग सहाव्यांदा श्रीपाद नाईक हे निवडणूक लढवत असून यावेळी पक्षासमोर मते वाढवण्याचे आव्हान आहे तर काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांच्यासाठी ही राजकीय अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

२५ वर्षांपूर्वी १९९९ साली खलप विरुध्द श्रीपाद अशी लढत झाली होती. त्यावेळी खलप यांना पराभव पत्करावा लागला होता. श्रीपाद नाईक यांना त्यावेळी १,०४,९५८ तर खलप यांना काँग्रेसच्या तिकिटावर ६८,२३७ मते मिळाली होती. विशेष म्हणजे त्याआधीच्या १९९६ च्या निवडणुकीत मगोपच्या तिकिटावर विजयी झालेले खलप केंद्रात कायदामंत्री असतानाही १९९९ ची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर जिंकू शकले नाहीत.

श्रीपाद हे सहाव्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत असून उत्तरेत प्रस्थापितविरोधी लाट आहे का? आणि असलीच तर त्याचा फायदा उठवण्यात खलप यांना यश येईल का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दुसरीकडे भाजपाची मते वाढवण्यासाठी उत्तरेतील पाच फुटीर काँग्रेस आमदार, जे सप्टेंबर २०२२ साली भाजपात प्रवेशकर्ते झाले त्यांची कसोटी लागणार आहे. कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांच्यासाठी ही निवडणूक जरा जास्तच परीक्षेची ठरणार आहे. फुटिरांपैकी आमदार मायकल लोबो २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपसोबत होते.

२०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीचा साताठ महिन्यांचा काळ सोडल्यास ते भाजपमध्येच होते. शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो याही पूर्वी पतीसोबत भाजपसाठीच काम करायच्या. साळगांवचे आमदार केदार नाईक हेही २०२२ च्या विधानसभा निवडणूक काळापुरतेच तिकिटासाठी काँग्रेसमध्ये गेले व निवडून येऊन पुन्हा भाजपात परतले. २०१९ साली त्यांनी भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांच्यासाठीच काम केले होते. 

लोबो हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत श्रीपाद नाईक यांना समाधानकारक मते मिळवून देऊ शकले नव्हते. त्यांच्या कळंगुट मतदारसंघात त्यावेळी काँग्रेस उमेदवार गिरीश चोडणकर यांना जास्त मते मिळाली होती. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी मात्र बार्देस तालुका पिंजून काढला आहे. मांद्रे मतदारसंघात मगोपचे आमदार जीत आरोलकर व भाजपचे माजी आमदार दयानंद सोपटे अशी दुहेरी साथ श्रीपाद यांना लाभली आहे. आमदार प्रवीण आर्लेकर प्रत्यक्ष फिरताना दिसत आहेत.

सर्वाधिक ३३ आमदार भाजपकडे आहेत. सत्तरी तालुक्यात लोकसभेसाठी भाजप उमेदवाराला जास्त मते मिळतात त्यामुळे श्रीपाद नाईक यांची यावेळी ही सत्तरीवर भिस्त आहे. भंडारी समाज कोणती भूमिका घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. श्रीपाद नाईक हे भंडारी समाजाचे असले तरी प्रस्थापितांविरोधी भावना आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतो. काँग्रेसने खलप यांच्या रुपाने मराठा समाजाचा उमेदवार दिला आहे. दरम्यान, आरजीचे प्रमुख मनोज परब हेही आपले नशीब आजमावात आहेत.

२०१९ च्या गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमदेवार श्रीपाद नाईक यांना २ लाख ४४ हजार ८४४ मते मिळाली होती. त्यांच्या मतांची टक्केवारी ५७.१२ टक्के होती. प्रतिस्पर्धी काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांना १ लाख ६४ हजार ५८७ मते मिळाली. हे प्रमाण ३८.४० टक्के होते. त्याआधी २०१४ च्या निवडणुकीत श्रीपाद यांना २ लाख ३७ हजार ९०३ मते मिळाली. हे प्रमाण, ५८.५१ टक्के होते. तर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे रवी नाईक यांना १ लाख ३२ हजार ३०४ मते मिळाली. हे प्रमाण ३२.५४ टक्के होते.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपने १९ विधानसभा जागांवर आघाडी कायम ठेवली होती. लोबोंचा कळंगुट मतदारसंघ हा एकमेव अपवाद होता. नाईक यांनी उत्तर गोव्याची जागा एक लाखांहून अधिक मतांनी जिंकली. उत्तर गोव्यात भाजपच्या मतांचा वाटा १९९९ मधील ५४.९६ टक्के मतांवरून २०१४ मध्ये ५८.५१ टक्के इतका वाढला. काँग्रेसला २०१४ मध्ये सुमारे ३३ टक्के मते मिळाली. २००९ च्या लोकसभा निवडणकीत काँग्रेससोबत लोकस- भेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीत होता. तरीही श्रीपाद नाईक यांनी जवळपास ६,३०० मतांच्या फरकाने विजय मिळवला. 

टॅग्स :goaगोवाgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस