शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

१५ आॅक्टोबरनंतरच काँग्रेस गट समित्या

By admin | Updated: October 6, 2014 02:02 IST

महाराष्ट्र, हरियाणातील निवडणुकांमुळे शिक्कामोर्तब रखडले

पणजी : काँग्रेस गट समित्यांचे पुनर्गठन महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकांमुळेच रखडले असून पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी तसेच पक्षप्रभारी दिग्विजय सिंह हे निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याने येत्या १५ तारखेनंतरच प्रदेशाध्यक्षांनी सादर केलेल्या नावांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या चाळीसही गट समित्यांची पुनर्रचना केली जाणार असून प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी गेल्या २२ सप्टेंबर रोजी गटाध्यक्ष तसेच दोन्ही जिल्हाध्यक्षांची नावे श्रेष्ठींना सुचविली आहेत. या गट समित्या हंगामी असतील. पुढील वर्षी आॅगस्टमध्ये पक्षांतर्गत निवडणुका होणार असल्याने वर्षभराच्या काळासाठीच या समित्या अस्तित्वात असतील. दरम्यान, काँग्रेसचे स्थानिक नेते सोमवारी शेजारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणूक प्रचारासाठी रवाना होत असल्याची माहिती जॉन यांनी दिली. यात प्रदेश उपाध्यक्ष बाबी बागकर, खजिनदार शंभू भाऊ बांदेकर, सरचिटणीस उल्हास परब, सचिव वामन चोडणकर यांचा समावेश आहे. सावंतवाडीत कोकणी भाषिक विभागात आपणही प्रचारासाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)