शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट आयोजनात घोटाळा, काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 9:10 PM

गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्टच्या आयोजनात घोटाळा असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसने केला आहे.

पणजी : गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्टच्या आयोजनात घोटाळा असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसने केला आहे. २ कोटी रुपये खर्च अपेक्षित असताना तब्बल ४ कोटी ९७ लाखांचा खर्च मंजूर करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन ट्रॅव्हल मार्ट रद्द करावे, अशी मागणी पक्षाने केली आहे. 

पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांच्यावर पुन: हल्लाबोल करताना ३0 टक्के कमिशनवर सर्व व्यवहार चालले आहेत, असा आरोप केला. ते म्हणाले की, ‘ याआधी दोन ट्रॅव्हल मार्ट झाली त्याला २ कोटींपेक्षा अधिक खर्च आला नव्हता. यावेळी मात्र ४ कोटी ९७ लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करुन घेण्यात आले यात कमिशनचाही समावेश आहे. याबद्दलच पुरावेही आपल्याकडे आहेत. राज्य स्तरीय मार्केटिंग समितीची बैठक गेल्या २ जानेवारी रोजी झाली तींत विषयपत्रिकेत ट्रॅव्हल मार्टचा विषय नसताना एका सदस्याने वैयक्तिक कामकाजाच्यावेळी हा विषय काढला आणि त्याला मंजुरी घेण्यात आली. वास्तविक हे ट्रॅव्हल मार्ट गेल्या एप्रिल, मे मध्ये होणार होते परंतु ते झाले नाही आता येत्या २३ ते २५ या कालावधीत होणार आहे. या ट्रॅव्हल मार्टचा कोणताच फायदा गोवेकरांना होणार नाही, उलट भ्रष्टाचाराला आंदण मिळेल त्यामुळे ते रद्द करावे.’

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार असलेल्या या मार्टला ७00 निमंत्रितांची उपस्थिती गृहित धरले आहे. एलिझा पर्पल अ‍ॅडव्हर्टायझिंग कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. यात भ्रष्टाचार झालेला असून ज्याअर्थी निदर्शनास आणूनही मुख्यमंत्री कोणतीही कारवाई करीत नाहीत त्याअर्थी पर्यटनमंत्र्यांबरोबर मुख्यमंत्री सावंत यांचाही या भ्रष्टाचारात सहभाग असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप चोडणकर यांनी केला आहे.

२ कोटी खर्चाच्या या ट्रॅव्हल मार्टसाठी ४ कोटी ९७ लाखांचा अंदाजित खर्च दाखवणाºया अधिकाºयांवरही कारवाई केली जावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे. राज्यस्तरीय मार्केटिंग समितीच्या दहाव्या आणि अकराव्या बैेठकीतील कामकाजाचा हवाला देताना चोडणकर म्हणाले की,‘या ट्रॅव्हल मार्टच्या आयोजनात भ्रष्टाचार आहे हे अगदी स्पष्ट होते.

गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्टचे आयोजन ज्या काळात केले आहे त्याच काळात लंडनमध्ये सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळा होतो त्यामुळे येथे उपस्थिती लाभणार नाही, असे ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टूर असोसिएशन आॅफ गोवा या संघटनेने कळविले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही चोडणकर म्हणाले. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष अमरनाथ पणजीकर, प्रतिभा बोरकर आदी उपस्थित होत्या. 

 पर्यटनमंत्र्यांनी आरोप फेटाळले

दरम्यान, पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी सर्व आरोप फेटाळताना पर्यटन खात्याच्या प्रत्येक कामाच्या निविदांमध्ये पारदर्शकता असते आणि वित्तीय परवानगी घेतल्याशिवाय कोणतीच गोष्ट केली जात नाही, असा दावा केला. गिरीश चोडणकर यांना जर काही सापडले असेल तर त्यांनी अवश्य कोर्टात जावे, असे ते म्हणाले. आजगांवकर पुढे म्हणाले की, ‘काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना निराधार आरोप करुन प्रसिध्दी मिळविण्याची सवय झालेली आहे. काँग्रेस पक्षात त्यांचे नेतृत्त्व मानायला कोणी तयार नाही म्हणून तर त्यांचे दहा आमदार फुटले त्यांनी आधी आपल्या पायाखालची वाळू सरकतेय याकडे लक्ष द्यावे. 

टॅग्स :congressकाँग्रेसgoaगोवा