शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात ‘एम्स’च्या धर्तीवर महाविद्यालय

By admin | Updated: June 21, 2014 01:46 IST

पणजी : दिल्लीतील आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस (एम्स)च्या धर्तीवर गोव्यासह अकरा राज्यांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील उच्च दर्जाचे वैद्यकीय महाविद्यालय

पणजी : दिल्लीतील आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस (एम्स)च्या धर्तीवर गोव्यासह अकरा राज्यांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील उच्च दर्जाचे वैद्यकीय महाविद्यालय तथा इस्पितळ उभारण्याची तयारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चालवली असून गोव्यासह या सर्व राज्यांना त्यासाठी जमीन शोधण्याचे आवाहन करणारी पत्रे पाठवण्यात आली आहेत. आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, केंद्राकडून अद्याप पत्र मिळायचे आहे; परंतु एम्सची स्थापना गोव्यात होत असेल तर त्याचे स्वागतच आहे. गोमेकॉचा दर्जा वाढवता येईल. गोमेकॉच्या आवारात जी १0 लाख चौरस मीटर जमीन आहे, ती या संस्थेसाठी देण्याची तयारीही सरकारने ठेवलेली आहे. केंद्रातील आधीच्या संपुआ सरकारने गोमेकॉत सुपरस्पेशालिटी ब्लॉकसाठी राज्य सरकारचा २५ टक्के आणि केंद्राचा ७५ टक्के वाटा या तत्त्वावर १५0 कोटींचा तर कॅन्सर केअर सेंटरसाठी याच तत्त्वावर ४५ कोटींचा प्रकल्प मंजूर केला होता; परंतु हे सर्व कागदोपत्रीच राहिले होते. आता त्याला चालना मिळेल. गोव्यासह केरळ, तामिळनाडू, गुजरात, आसाम, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, पंजाब व हरियाणा या राज्यांमध्ये अशी महाविद्यालये उभारण्याची योजना आहे. २५00 एकरपेक्षा जास्त जमीन शोधण्याचे आवाहन प्रत्येक वरील राज्याला करण्यात आले आहे. राज्यांनी ही जमीन मोफत द्यावी लागेल. या जागेत वीज तसेच पाण्याची योग्य सोय आवश्यक आहे. केंद्र सरकारचे अधिकारी जमिनीची पाहणी करणार आहेत. एम्समध्ये वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी मोठी स्पर्धा असते. आयआयटीसारखी त्यांची स्वत:ची परीक्षा असते. सर्व सुपर स्पेशालिटी एम्समध्ये असतात. त्यामुळे ही संस्था गोव्यात झाल्यास त्याचा फार मोठा लाभ वैद्यकीय विद्यार्थ्यांना होणार आहे. दरम्यान, गोव्यात एनआयटीसाठी कुंकळ्ळी येथे भूसंपादनाची प्रक्रिया चालू असल्याची माहिती तांत्रिकी शिक्षण संचालनालयातील सूत्रांनी दिली. देशभरात आठ आयआयटी स्थापन करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी प्रयत्नशील असून गोव्यासह केरळ, कर्नाटक, झारखंड, उत्तराखंड, सिक्कीम व छत्तीसगढ मिळून एकूण आठ राज्यांमध्ये अजून आयआयटी होणार आहेत. (प्रतिनिधी)