शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आजपासून महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया; डिजिटल पोर्टलवर करा अर्ज, ६ एप्रिलपर्यंत मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:55 IST

राज्यातील एकूण ३४ महाविद्यालये या प्रक्रियेत सहभागी होत असून, पहिल्या फेरीसाठीचे ऑनलाइन प्रवेश पोर्टल २३ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून खुले होतील.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: उच्च शिक्षण संचालनालयाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पदवी स्तरावरील प्रवेश प्रक्रियेची घोषणा केली आहे. यावर्षीही संपूर्ण प्रक्रिया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एकाच केंद्रीय डिजिटल पोर्टलद्वारे होणार आहे.

राज्यातील एकूण ३४ महाविद्यालये या प्रक्रियेत सहभागी होत असून, पहिल्या फेरीसाठीचे ऑनलाइन प्रवेश पोर्टल २३ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून खुले होतील. ६ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. तसेच, ज्या विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत, त्यांनाही शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात अर्ज करण्याची विशेष सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

उच्च शिक्षण संचालनालयाच्या https://www.dhe.goa.gov.in/ या संकेतस्थळावरील एकिकृत प्रक्रियेद्वारे २० हून अधिक विविध प्रकारचे बहुशाखीय अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ही ऑनलाइन प्रणाली पारदर्शक आणि विद्यार्थी-केंद्रित असून, सर्व अर्जदारांना समान संधी मिळावी हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या प्रवेश प्रक्रियेचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अर्ज करण्यापासून ते प्रवेश निश्चितीपर्यतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता उरलेली नाही.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्य विकास आणि सर्वांगीण शिक्षणाला चालना देणारे अभ्यासक्रम निवडण्याची लवचिकता विद्यार्थ्यांना मिळेल.

अभ्यासक्रम, पात्रता आणि प्रवेश क्षमता याबद्दलची सविस्तर माहिती संबंधित महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर ई-माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिली आहे. उच्च शिक्षण संचालनालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना घरबसल्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

पाच पसंतीक्रम निवडण्याची मुभा

राज्य सरकारच्या उच्च शिक्षण संचालनालयाने सुरू केलेल्या या नवीन ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पसंतीक्रमाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रणालीनुसार, अर्जदार आपल्या आवडीच्या आणि पात्रतेच्या आधारावर राज्यातील विविध महाविद्यालयांमधील जास्तीत जास्त पाच वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी पसंतीक्रम नोंदवू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ एकाच महाविद्यालयावर अवलंबून न राहता, विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमांची निवड करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. ही लवचिकता विद्यार्थ्यांच्या करिअरच्या संधी वाढवणारी असून, प्रवेश प्रक्रियेतील स्पर्धात्मकता लक्षात घेता त्यांना आपल्या पसंतीच्या विषयांत प्रवेश मिळवणे अधिक सुलभ होणार आहे.

अर्ज कधीपासून ? : दि. २३ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून.अर्ज कधीपर्यंत ? : दि. ६ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra College Admissions Begin Today; Apply Online by April 6

Web Summary : Maharashtra's higher education announces degree admissions via a central digital portal, following NEP 2020 guidelines. 34 colleges participate; apply online from March 23 to April 6. Provisional applications available for students awaiting results. Five course preferences allowed.
टॅग्स :goaगोवाAdmissionप्रवेश प्रक्रियाcollegeमहाविद्यालयEducationशिक्षण