राज्यात कोळसा वाहतूक वाढणार नाही; सरकारने केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 07:35 IST2025-09-03T07:34:22+5:302025-09-03T07:35:11+5:30
उगाच अफवांवर विश्वास ठेवू नका. ही चुकीची माहिती पसरविली जात असल्याचेही सरकारने म्हटले आहे.

राज्यात कोळसा वाहतूक वाढणार नाही; सरकारने केले स्पष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : होस्पेट-वास्को डबल ट्रॅकिंग प्रकल्पाच्या संदर्भात कोळसा हाताळणीसाठी अतिरिक्त जमीन संपादनाच्या वार्ता चुकीच्या आहेत. रेल विकास निगम लिमिटेड कासावली, सांकवाळ आणि इसोशीम येथून जाणाऱ्या या प्रकल्पासाठी केवळ ०.६ हेक्टर इतकीच जागा वापरली जाणार आहे आणि तीच जमीन ताब्यात घेतली आहे. त्यामुळे उगाच अफवांवर विश्वास ठेवू नका. ही चुकीची माहिती पसरविली जात असल्याचेही सरकारने म्हटले आहे.
सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे की, हॉस्पेट ते गोवा रेल्वे रूळ दुपदरीकरण प्रकल्पासाठी अतिरिक्त जमीन संपादित केली जात असल्याच्या वार्ता खोट्या आहेत. चालू प्रकल्प हा या प्रकल्पाचे उद्दिष्ट पर्यटन विकास आणि कोळशासह विद्यमान मालवाहतुकीची जलद हालचाल सुलभ करणे आहे, तर एक्स्पोजर वेळ कमी करून अनुषंगिक प्रदूषण कमी करणे आहे. या प्रकल्पामुळे राज्यात कोळसा वाहतुकीची क्षमता वाढणार नाही, अशी ग्वाही सरकारकडून देण्यात आली आहे.
प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट पायाभूत सुविधा सुधारणे आणि प्रदूषण कमी करणे आहे, कोळसा हाताळणी क्षमता वाढवणे नाही, असे म्हटले आहे.