जैवविविधता मंडळाच्या 'गोवन' बँडबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 10:43 IST2025-11-19T10:43:03+5:302025-11-19T10:43:38+5:30
प्रकल्पाची प्रगती, चालू उपक्रम आणि पुढील वाटचालीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.

जैवविविधता मंडळाच्या 'गोवन' बँडबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतला आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी बैठकीत जैवविविधता मंडळाच्या 'गोवन' ब्रँडबद्दल आढावा घेतला. स्थानिक जैवसंसाधनांचे मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये रूपांतर करून शाश्वत रोजगार आणि उत्पन्न निर्माण करून देण्यासाठी हा उपक्रम आहे. हा उपक्रम जैवसंपत्तीचे मालक आणि ग्राहक यांच्यात थेट संबंध प्रस्थापित करतो. 'गोवन' बॅण्डबाबत चौथ्या केंद्रीय सुकाणू आणि व्यवस्थापन समितीच्या बैठकीचे आयोजन मंत्रालयात करण्यात आले होते. प्रकल्पाची प्रगती, चालू उपक्रम आणि पुढील वाटचालीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.
सावंत म्हणाले की, 'सरकार शेवटच्या टप्प्यापर्यंत सेवा वितरण मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी फायदेशीर किंमत मिळावी याची खात्री करणे, उत्पादनांसाठी एक शाश्वत, स्वावलंबी ब्रँड तयार करणे या गोष्टींना तसेच शाश्वत आर्थिक पर्याय निर्माण करून गोव्याच्या समृद्ध जैवविविधतेचे जतन करणे हे मुख्य ध्येय आहे.' दरम्यान, या प्रकल्पांतर्गत प्रक्रिया केंद्रांची स्थापना समाविष्ट आहे. अशाच एका सुविधेचे उद्घाटन ऑगस्टमध्ये पिसुर्लेत झाले होते.