मुख्यमंत्र्यांनी घेतला माध्यान्हचा आस्वाद; देऊळवाडा-माशेल येथील प्राथमिक शाळेला आकस्मिक भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:56 IST2025-06-25T12:55:10+5:302025-06-25T12:56:17+5:30

मुख्यमंत्री शाळेत येताच शिक्षकांची धावपळ उडाली. मधली सुटी झाली होती. मुले माध्यान्हची वाट पाहत होते. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून इडली-सांबार खाण्यास सुरुवात केली.

cm pramod sawant enjoyed his lunch made a surprise visit to a primary school in deulwada marcel | मुख्यमंत्र्यांनी घेतला माध्यान्हचा आस्वाद; देऊळवाडा-माशेल येथील प्राथमिक शाळेला आकस्मिक भेट

मुख्यमंत्र्यांनी घेतला माध्यान्हचा आस्वाद; देऊळवाडा-माशेल येथील प्राथमिक शाळेला आकस्मिक भेट

लोकमत न्यूज नेटवर्क, माशेल : देऊळवाडा-माशेल येथील प्राथमिक शाळेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी अचानक भेट देऊन शाळेची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शाळेत दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह आहाराचाही आस्वाद घेतला.

माशेल येथील या शाळेची पटसंख्या १२७ आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार येथील इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळे याच परिसरात अन्यत्र किमान एक हजार चौरस मीटर जागा उपलब्ध असल्यास मला सांगाल त्या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत उभारू, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी मुख्याध्यापिका अनुजा नाईक, शिक्षिका मंदा भगत, पौर्णिमा कोरगावकर, सिद्धी चारी, शिक्षक नामदेव फोंडेकर यांच्याशी चर्चा केली. तसेच माध्यान्ह आहार पुरवणाऱ्या गटाला आणखी चांगल्या दर्जाचा आहार पुरविण्यास सांगा, अशी सूचनाही शिक्षकांना केली.

इडली-सांबार...

मुख्यमंत्री शाळेत येताच शिक्षकांची धावपळ उडाली. मधली सुटी झाली होती. मुले माध्यान्हची वाट पाहत होते. मुख्यमंत्री शाळेची पाहणी करू लागले. त्याचवेळी माध्यान्ह आहार दाखल झाला. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून इडली-सांबार खाण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी 'सांबार पातळ असल्याचे सांगून त्यामध्ये भाज्यांचा अधिक वापर करा', अशी सूचना केली.

 

Web Title: cm pramod sawant enjoyed his lunch made a surprise visit to a primary school in deulwada marcel