चिराग नायक कॉग्रेसमध्ये दाखल; दिगंबर कामत यांना मडगावात आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 12:01 IST2025-05-23T12:00:19+5:302025-05-23T12:01:16+5:30
माझ्यासोबत आणि काँग्रेस पक्षासोबत दामबाब असून आगामी निवडणुकीत मडगावमध्ये बदल होईल, असे प्रतिपादन चिराग नायक यांनी केले.

चिराग नायक कॉग्रेसमध्ये दाखल; दिगंबर कामत यांना मडगावात आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : मडगाव येथील उद्योजक तथा साहित्यिक दत्ता नायक यांचे पुत्र चिराग नायक यांनी आज, गुरुवारी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. माझ्यासोबत आणि काँग्रेस पक्षासोबत दामबाब असून आगामी निवडणुकीत मडगावमध्ये बदल होईल, असे प्रतिपादन चिराग नायक यांनी केले.
काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधीपक्ष नेते युरी आलेमाव, ज्येष्ठ काँग्रेस नेते गिरीश चोडणकर, अंजली निंबाळकर यांच्या उपस्थितीत चिराग यांनी हा प्रवेश केला.
दिगंबर कामत यांनी अनेक वर्षे मडगावमध्ये निवडून येऊनही शहरात आजही मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. मडगाववासीयांची फसवणूक करून त्यांनी नेहमीच सत्तेचे राजकारण केले आहे. मात्र, मडगाववासीय आता त्यांच्या राजकारणाला कंटाळले असून त्यांचा मला पाठिंबा आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी कामत यांनी पक्ष बदलाचे राजकारण केले. त्यामुळे आता त्यांना कायमचे घरी बसविण्याची वेळ आल्याची टीकाही नायक यांनी केली.