शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बागायतदारांकडून काजूची निवड तर कारखानदारांनी काजू घेणे केले बंद; अवकाळी पावसाने काजू बिया पडल्या काळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 15:41 IST

गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या अवकाळी पावसामुळे काजू बिया खराब झाल्या आहेत. अजूनही काही काजू उत्पादकांना काजू मिळत आहेत.

नारायण गावस -

पणजी: सध्या राज्यात काजू हंगाम संपला तरी ही अजून काजू बागायतदारांना काजू मिळत आहेत. पण अवकाळी पावसामुळे काजू बिया कुजल्याने काळे पडले आहेत. पण आता काजू कारखानदारांनी काजू घेणे बंद केले आहे. गाेवा बागायदारमध्ये काजू घेतले जात असले तरी त्या काजू बिया निवडल्या जात आहे. यामुळे काजू उत्पादकांना फटका बसला आहे.

बागायतदारामध्ये काजूची निवडगेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या अवकाळी पावसामुळे काजू बिया खराब झाल्या आहेत. अजूनही काही काजू उत्पादकांना काजू मिळत आहेत. गावठी काजू उशीरा लागल्याने त्याचे उत्पादन आता मिळत आहे. पण पावसामुळे हे काजू बिया काळ्या झाल्या आहेत. त्यामुळे कारखानदारांनी काजू बिया खरेदी करणे  बंद केले आहे. गाेवा बागायतदारमध्ये घेतले जात आहे पण तेथेही  काजू बिया निवडल्या जात आहेत. फक्त चांगले काजू घेतले जात आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांना याचे नुकसान झाले आहे. जर १० किलो काजू विक्रीस आणले तर त्यातील ५ किलो काजू  खराब म्हणून काढले जातात.

या वर्षी अगोदरच काजूचे उत्पादन घटले आहे. यंदा ५० टक्क्यांनी काजू उत्पादन घटले त्यात दरही कमी  मिळाला. यावर्षी १११ ते ११५ पर्यंत काजू प्रती किलो दर मिळाला. गेल्या वर्षी तो १२५ हाेता. त्यामुळे काजू उत्पादकांनी निराशा व्यक्त केली. काही डोंगराळभागात काजू आता पुन्हा लागले आहेत. पण आता हंगाम संपल्याने दर मिळत नाही. काही ठिकाणी १०० रुपये प्रती किलोने  घेतले जात आहे. बागायतदारमध्ये दर असला तरी तिथे चांगल काजू घेतला जातो याचा फटका काजू उत्पादकांना बसतो. त्यामुळे  सर्वच काजू उत्पादक यंदा  नुकसानीत सापडले आहे.

काणकोणचे काजू उत्पादक सुर्यकांत वेळीप म्हणाले आमच्या कलमी काजू सुरुवातीला लागले होते. त्याला फक़्त १११ रुपये प्रति  किलाे दर  मिळाला. आता मे महिन्यात गावठी काजूचे उत्पादन मिळत आहे. पण गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे काजू बिया काळ्या पडल्याने कारखानदार घेत नाही. तर बागायतदारमध्ये काजू बिया  निवडल्या जात आहेत. त्यामुळे याेग्य दर मिळत नाही उलट नुकसान झाली आहे.

डिचोलीचा काजू उत्पादक  कृष्णा गावकर म्हणाले यंदा अगोदरच उत्पादन घटले त्यात दरही तुटपूंजा मिळाला. आता अवकाळी पावसाने काजू उत्पादन खराब झाले. मे पूर्ण महिना उत्पादन मिळाले असते. पण मध्येच पडलेल्या अवकाळी  पावसामुळे काजू  बिया खराब झाल्या ते आता कुणीही घेत नाही.  यामुळे आमची नुकसान झाली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस