लाचखोर पीएफ अधिकारी अटकेत

By Admin | Updated: June 11, 2014 01:18 IST2014-06-11T01:15:38+5:302014-06-11T01:18:45+5:30

पणजी : भविष्य निर्वाह निधीच्या बाबतीत आवश्यक त्या अटींची पूर्तता न करणाऱ्या एका कंपनीला कोड बहाल करण्यासाठी लाच घेताना पीएफ

The bribe PF officer detained | लाचखोर पीएफ अधिकारी अटकेत

लाचखोर पीएफ अधिकारी अटकेत

पणजी : भविष्य निर्वाह निधीच्या बाबतीत आवश्यक त्या अटींची पूर्तता न करणाऱ्या एका कंपनीला कोड बहाल करण्यासाठी लाच घेताना पीएफ कार्यालयातील हिमेश रंजन प्रकाश या अधिकाऱ्याला वास्को येथे सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले.
बांबोळी येथील सीबीआय कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमेश याने या कंपनीकडे ६0 हजार रुपये मागितले होते. टोकन म्हणून सुरुवातीला ५ हजार रुपये देण्याचे कंपनीच्या अधिकाऱ्याने कबूल केले आणि सीबीआय अधिकाऱ्यांना कळविले. त्यानुसार उपअधीक्षक के. पाल यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. एस. परब, उपनिरीक्षक ए. के. चौहान, कॉन्स्टेबल अभय फडते, सचिन सावंत आणि बाळकृष्ण यांनी वास्कोत सापळा रचून हिमेश याला पकडले. त्याला देण्यात आलेल्या नोटांवर खूण करण्यात आली होती. भ्रष्टाचारविरोधी कायद्याच्या कलम ७ नुसार गुन्हा नोंदवून हिमेश याला अटक करण्यात आली असून रिमांडसाठी सीबीआय न्यायालयात हजर केले जाणार आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुध्द सीबीआयने मोहीम उघडली असून काही महिन्यांपूर्वी एका केंद्रीय अधिकाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आले होते.
(प्रतिनिधी)

Web Title: The bribe PF officer detained