मांडवी नदीत आढळला कामगाराचा मृतदेह; गोवा पोलिसांचा तपास सुरू

By पूजा प्रभूगावकर | Updated: February 23, 2024 12:38 IST2024-02-23T12:38:03+5:302024-02-23T12:38:19+5:30

मागील दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. सहाय याचा मृतदेह मांडवी नदीत आढळून आल्याने त्याचा मृत्यू कसा झाला याबाबत सांशक्ता निर्माण झाली आहे.

Body of worker found in Mandvi river; Goa Police is investigating | मांडवी नदीत आढळला कामगाराचा मृतदेह; गोवा पोलिसांचा तपास सुरू

मांडवी नदीत आढळला कामगाराचा मृतदेह; गोवा पोलिसांचा तपास सुरू

पणजी: कांपाल- पणजी येथील इंडोर स्टेडियमच्या मागे मांडवी नदीत शुक्रवारी पहाटे मृतदेह तरंगता आढळून आला. अग्नीशमल दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.सदर मृतदेह हा मालीम जेटी येथील कामगाराचा असल्याचे पणजी पोलिसांनी सांगितले.

या कामगाराचे नाव सुरजीत सहाय (झारखंड) असे असून तो मालीम येथील मच्छीमार जेटीवर कामाला होता. मागील दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. सहाय याचा मृतदेह मांडवी नदीत आढळून आल्याने त्याचा मृत्यू कसा झाला याबाबत सांशक्ता निर्माण झाली आहे. त्याचा मृतदेह हा बांबोळी येथील गोमेकाॅ इस्पितळात उत्तरणीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहे.

दरम्यान गुरुवारी संध्याकाळी पणजी येथील मांडवी पुलावर रेंट अ कार व मोटारसायकल दरम्यान झालेल्याअपघातात मोटारसायकल चालक जावेद सडेकर हा युवक पुलावरुन थेट मांडवी नदीत फेकला गेला होता. त्याचाही पोलिस, नौदल तसेच अग्नीशमन दलाकडून मांडवी नदीत सध्या शोध घेतला जात आहे.

Web Title: Body of worker found in Mandvi river; Goa Police is investigating