भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा साळगावामध्ये प्रचारात सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 12:59 IST2025-12-10T12:58:59+5:302025-12-10T12:59:33+5:30
प्रथम शांतादुर्गा मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर, राष्ट्रोळी शांतादुर्गा मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला.

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा साळगावामध्ये प्रचारात सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या तयारीला गती देण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, साळगावचे आमदार केदार नाईक यांनी भाजप उमेदवार रेश्मा बांदोडकर यांच्या प्रचार करताना नेरुल आणि सांगोल्डा पंचायत क्षेत्रात दौरा करून नागरिक व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
या प्रचार कार्यात त्यांच्यासोबत उमेदवार रेश्मा बांदोडकर, साळगाव मतदारसंघाचे भाजप अध्यक्ष गौरेश मडकईकर, जनरल सेक्रेटरी दीपक राणे, अजय गोवेकर, करण गोवेकर, उत्तर गोवाभाजपा जिल्हा सचिव रमेश घाडी, सरपंच राजेश कळंगुटकर, पंच दशरथ कळंगुटकर, उपसरपंच, इतर पंच, महिला मोर्चा अध्यक्ष, ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रथम शांतादुर्गा मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर, राष्ट्रोळी शांतादुर्गा मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला त्यानंतर आपल्या दौऱ्याच्या वेळी दोन्ही नेत्याने कार्यकर्त्यांच्या समावेत काही घरांना भेट देत केंद्र व राज्य सरकारने राबवलेल्या विविध जनकल्याणकारी योजनाची माहिती पुस्तिका देण्यात आली.
या निवडणुकीत विकास हेच प्रमुख अजेंडा असून जनतेचा व्यापक सहभाग मिळावा यासाठी कार्यकर्त्याने प्रत्येक घरात जाऊन संवाद साधण्याचे नियोजन आखण्यात यावे, असे आवाहन आमदार नाईक यांनी कार्यकर्त्यांच्या कोपरा बैठकीत केले.
सरकारी योजना सांगण्यावर भर
गोव्यात भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेला विकास व सर्वांगीण प्रगती जनतेच्या लक्षात आहे. तर साळगाव मतदार संघात आमदार केदार नाईक यांनी केलेला विकास पाहता यंदा आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपा उमेदवारांचा विजय ठरलेला आहे, असा विश्वास गोवा प्रदेश भाजपा अध्यक्ष दामोदर नाईक यांनी कोपरा बैठकीत केले.