भाजप अध्यक्ष नितीन नबीन उद्यापासून गोवा दौऱ्यावर: प्रदेशाध्यक्ष दामू नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 09:45 IST2026-01-29T09:45:39+5:302026-01-29T09:45:39+5:30

आमदार, कार्यकर्ते यांच्याशी साधणार संवाद

bjp president nitin nabin to visit goa from tomorrow state president damu naik | भाजप अध्यक्ष नितीन नबीन उद्यापासून गोवा दौऱ्यावर: प्रदेशाध्यक्ष दामू नाईक

भाजप अध्यक्ष नितीन नबीन उद्यापासून गोवा दौऱ्यावर: प्रदेशाध्यक्ष दामू नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजप अध्यक्ष नितीन नबीन हे ३० व ३१ जानेवारीला गोवा दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते पक्षाचे आमदार, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधतील, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नबीन हे भाजप अध्यक्ष झाल्यापासून सध्या विविध राज्यांना भेटी देत आहेत. त्यानुसार ते गोव्याच्या दोनदिवसीय दौऱ्यावर येत असून, या काळात ते पक्ष संघटना मजबूत करणे, आदी पक्षाशी संबंधित विषयांवर चर्चा करतील, असेही त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष नाईक म्हणाले की, नबीन यांचे ३० रोजी मोपा विमानतळावर आगमन होईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पक्षाचे खासदार तसेच पदाधिकारी त्यांचे स्वागत करतील. त्यानंतर ते पक्षाचे आमदार, पदाधिकारी, पक्षाच्या विविध मोर्चाचे अध्यक्ष, पदाधिकारी यांच्यासोबत बैठका घेऊ चर्चा करतील. याशिवाय ते राज्यातील विविध मंदिरांना भेटी देतील. तसेच मिरामार येथील गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर, तसेच माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतिस्थळालाही भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

नबीन हे ३१ रोजी ताळगाव येथील कम्युनिटी हॉलमध्ये सकाळी दहा वाजता बुथ कार्यकर्त्यांना आयोजित संमेलनात मार्गदर्शन करतील. पक्ष संघटना मजबूत करणे, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करणे, पक्षाकडून आयोजित कार्यक्रमांत सहभागी होणे असे एकूणच त्यांच्या गोवा दौऱ्याचे वेळापत्रक असल्याचे नाईक यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी सर्वानंद भगत व सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील

चिंबल येथील लोक मागील ३२ दिवसांपासून प्रस्तावित युनिटी मॉल, तसेच प्रशासन स्तंभ या दोन प्रकल्पांविरोधात आंदोलन करीत आहेत. याविषयी आंदोलक व मुख्यमंत्र्यांमध्ये काही बैठका झाल्या असून, चर्चा सुरू आहे. या विषयावर मुख्यमंत्री काय तो योग्य निर्णय घेतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.
 

Web Title : भाजपा अध्यक्ष नबीन का गोवा दौरा; पार्टी को मजबूत करने पर ध्यान

Web Summary : भाजपा अध्यक्ष नितिन नबीन 30 और 31 जनवरी को गोवा का दौरा करेंगे। वे पार्टी को मजबूत करने और महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा करने के लिए पार्टी सदस्यों से मिलेंगे। नबीन मंदिरों और स्मारकों का भी दौरा करेंगे, और तालेगाओ में एक सम्मेलन में बूथ कार्यकर्ताओं को संबोधित करेंगे।

Web Title : BJP President Nabin to Visit Goa; Focus on Party Strength

Web Summary : BJP President Nitin Nabin will visit Goa on January 30th and 31st. He will meet with party members to strengthen the organization and discuss key issues. Nabin will also visit temples and memorials, and address booth workers at a convention in Taleigao.