शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मोठा दिलासा! अखेर पेट्रोल-डिझेल निर्बंधांतून दिली सूट; मच्छीमार, कृषी क्षेत्राला वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 07:54 IST

काही महत्त्वाच्या क्षेत्रांना या निर्बंधातून पूर्णतः सूट देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जिल्हाधिकाऱ्यांनी कॅन व बाटलीतून पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री व वापरावर काही निर्बंध लागू केले होते. पेट्रोल पंपवाल्यांनी ग्राहकांना किरकोळ स्वरूपात विक्री करू नये, असे आदेश दिले होते. पण, आता या निर्बंधांबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले असून, काही महत्त्वाच्या क्षेत्रांना या निर्बंधातून पूर्णतः सूट देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मच्छीमार आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित सर्व उपक्रमांवर कोणतेही निर्बंध लागू होणार नाहीत. यामध्ये मासेमारी करणाऱ्या बोटी, ट्रॉलर्स तसेच इतर जलवाहतूक साधनांचा समावेश आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय सुरळीतपणे सुरू राहणार असून मच्छीमारांना कोणतीही अडचण येणार नाही. 

तसेच, शैक्षणिक संस्थांनाही या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक आस्थापनांमध्ये आवश्यक सेवा आणि वाहतूक व्यवस्थेसाठी पेट्रोल-डिझेलचा वापर पूर्ववत सुरू राहणार. डिझेल जनरेटर वापरणाऱ्या संस्थांना आणि उद्योगांना देखील निर्बंध लागू होणार नाहीत.

शेतकऱ्यांना दिलासा

कृषी क्षेत्रालाही मोठा दिलासा देत, शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्री आणि उपकरणांसाठी पेट्रोल-डिझेलच्या वापरावर कोणतेही निर्बंध नसतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कामकाज कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहणार आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले की, आवश्यक सेवांसाठी सूट असली तरी इंधनाचा वापर जबाबदारीने करावा आणि सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Relief! Petrol-Diesel Restrictions Eased for Fishermen, Agriculture Sector

Web Summary : District authorities eased petrol-diesel restrictions, exempting fishermen, educational institutions, and the agricultural sector. Fishing boats, schools, colleges, and farming equipment can operate without restrictions. Citizens are urged to use fuel responsibly and follow guidelines.
टॅग्स :goaगोवाFuel Crisisइंधन टंचाईFuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंपDieselडिझेल