सिग्नल दुरुस्तीसाठी 'भीक मांगो' आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 13:14 IST2026-03-28T13:14:34+5:302026-03-28T13:14:34+5:30

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सांताक्रूझ काँग्रेस रस्त्यावर

begging movement for signal repair in goa | सिग्नल दुरुस्तीसाठी 'भीक मांगो' आंदोलन

सिग्नल दुरुस्तीसाठी 'भीक मांगो' आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मेरशी जंक्शन येथील वाहतूक सिग्नल दीर्घकाळापासून बंद आहे. वारंवार तक्रारी करूनही सरकारकडून कोणतीही दुरुस्तीची कार्यवाही न झाल्याने सांताक्रूझ काँग्रेस गट समितीने शुक्रवारी भीक मांगो आंदोलन केले. 

हातात करवंट्या घेऊन सिग्नल दुरुस्तीसाठी वाहनधारकांकडून पैसे जमविण्यात आले. सांताक्रूझ काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष जॉन नाझारेथ यांसह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

जॉन नाझारेथ म्हणाले, गेले अनेक महिने येथील सिग्नल बंद आहे. त्यामुळे येथे अपघात वाढले आहेत. सरकारकडे याविषयी वेळोवेळी पाठपुरावा करूनही सिग्नल दुरूस्ती करण्यात आलेली नाही.

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले. जॉन नाझारेथ म्हणाले, या सिग्नलसाठी निधी गोळा करण्यासाठी मेरशी जंक्शनवर वाहनचालकांकडून भीक मागत देणग्या गोळा केल्या. या प्रतीकात्मक कृतीद्वारे सिग्नल दुरुस्तीसाठी निधी नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करणार

जॉन नझारथ यांनी सरकारने तातडीने सिग्नल दुरुस्त करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी केली. लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
 

Web Title : सिग्नल मरम्मत के लिए 'भीख मांगो' आंदोलन, सरकार निष्क्रिय।

Web Summary : सांताक्रूज़ कांग्रेस ने मेरसे जंक्शन के टूटे सिग्नल के खिलाफ विरोध प्रदर्शन किया, ड्राइवरों से दान एकत्र किया। बार-बार शिकायतों को अनदेखा किया गया, जिससे दुर्घटनाएँ हुईं। पार्टी ने जल्द ही सिग्नल ठीक न होने पर आंदोलन तेज करने की चेतावनी दी।

Web Title : 'Begging' protest for signal repair due to government inaction.

Web Summary : Santa Cruz Congress protested Merces junction's broken signal, collecting donations from drivers. Repeated complaints were ignored, causing accidents. The party warns of intensified action if the signal isn't fixed soon.