बाबूश मोन्सेरात यांचे सूतोवाच; उत्पल पर्रीकर भाजपामध्ये आले तरी माझी हरकत नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 13:11 IST2026-03-15T13:11:39+5:302026-03-15T13:11:39+5:30

रोहित यांना आमदार करण्याचे स्वप्न

babush monserrat statement i would not mind if utpal parrikar joins bjp | बाबूश मोन्सेरात यांचे सूतोवाच; उत्पल पर्रीकर भाजपामध्ये आले तरी माझी हरकत नसेल

बाबूश मोन्सेरात यांचे सूतोवाच; उत्पल पर्रीकर भाजपामध्ये आले तरी माझी हरकत नसेल

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पणजीचे महापौर म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडलेले, आपले पुत्र रोहित मोन्सेरात हे तिसवाडी तालुक्यातील एका मतदारसंघातून आमदार होतील, असा विश्वास महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी व्यक्त केला आहे.

पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आगामी विधानसभा निवडणूक आणि गोव्यातील राजकीय घडामोडींबाबत महत्वपूर्ण भाष्य केले आहे. महापालिकेची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत पुन्हा एकदा मोठा विजय संपादन केल्यानंतर बाबूश यांनी मुलगा रोहित यांच्या राजकीय भविष्याबद्दल स्पष्ट संकेत दिले. रोहित आगामी विधानसभा निवडणूक तिसवाडी तालुक्यातील एका मतदारसंघातून लढवेल आणि तो आमदार म्हणून निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. रोहित कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील याची मात्र वाच्यता बाबूश यांनी केली नाही.

या मुलाखतीवेळी मोन्सेरात यांनी तिसवाडी तालुक्याचा उल्लेख केला. त्यांनी यावेळी कोणत्याही विशिष्ट अशा मतदारसंघाचे नाव जरी घेतले नसले तरी - रोहित यांना ताळगाव मतदारसंघातून येत्या विधानसभा निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची - माहिती सूत्रांकडून दिली जाते.

बाबूश यांच्या पत्नी व ताळगावच्या विद्यमान आमदार जेनिफर मोन्सेरात या आजारपणामुळे पुढील निवडणूक लढविणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या जागेवर रोहित हे निवडणूक लढवतील, असे नियोजन तयार असल्याचे सांगितले जाते. मात्र अद्याप बाबूश यांनी याविषयी उघडपणे काहीही घोषणा केलेली नाही.

कॅसिनोवाल्यांना वाटते, तेच सरकार चालवतात

बाबूश यांनी मांडवीतील कॅसिनोंच्या मुद्द्यावरही कडक भूमिका मांडली. आपणच सरकार चालवत आहोत, असे कॅसिनो चालकांना वाटते. हे चित्र बदलणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मांडवीतील कॅसिनो बोटींची मुदत २०२७ मध्ये संपत आहे. तेव्हा सरकारने आपल्या धोरणावर ठाम राहून त्यांना बाहेर हलवावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पक्ष व्यक्तीपेक्षा मोठाच

दिवंगत भाजप नेते, मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर बोलताना मोन्सेरात म्हणाले की, उत्पल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास आपली कोणतीही हरकत नाही. मनोहर पर्रीकर आयुष्यभर भाजपसाठी जगले. पक्ष कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठा असतो, असे सांगत बाबूश यांनी आपण पक्षाचे सामान्य कार्यकर्ते असल्याचे नमूद केले. उत्पलना वाटले तर त्याने भाजपमध्ये यावे. पक्षाने तिकीटाविषयी निर्णय घ्यावा, माझा आक्षेप नसेल असे ते म्हणाले.
 

Web Title : उत्पल पर्रीकर के भाजपा में शामिल होने पर बाबूश मोनसेरात को आपत्ति नहीं।

Web Summary : मंत्री बाबूश मोनसेरात ने संकेत दिया कि उनके बेटे रोहित आगामी चुनाव लड़ सकते हैं। उन्होंने उत्पल पर्रीकर के भाजपा में शामिल होने का समर्थन किया। मोनसेरात चाहते हैं कि 2027 के बाद कैसीनो हटा दिए जाएं, सरकार का नियंत्रण बना रहे।

Web Title : Babush Monserrate okay with Utpal Parrikar joining BJP.

Web Summary : Minister Babush Monserrate hinted his son Rohit may contest upcoming elections. He supports Utpal Parrikar joining BJP. Monserrate wants casinos moved after 2027, asserting government control.